घरताज्या घडामोडीपेट्रोल दर शंभरी पार, आता कुणाचं नशीब म्हणायचं प्रधानमंत्री महोदय, राष्ट्रवादीचा सवाल

पेट्रोल दर शंभरी पार, आता कुणाचं नशीब म्हणायचं प्रधानमंत्री महोदय, राष्ट्रवादीचा सवाल

Subscribe

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचा भाव कमी असताना देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ का?

राज्यात पेट्रोल, डिझेलचे भाव आस्मानाला भिडले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या भावाने शंभरी गाठली आहे. तर मुंबईसह अन्य शहरातील पेट्रेल डिझेलचे दर १०० रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. यवतमाळमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या पार झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचा भाव कमी असताना देशात मात्र पेट्रोलच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि पंतप्रधान मोदींचा जूना व्हिडिओ प्रसारित करुन टीका केली आहे. आपल्या नशीबामुळे देशात पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत तर जनतेसाठी चांगलंच आहे, असं पंतप्रधान २०१५ मध्ये जाहीर भाषणात सांगत होते. आता २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे, आता कुणाचं नशीब म्हणायचं प्रधानमंत्री महोदय? अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचा भाव कमी असताना देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ का करण्यात आली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला उत्तर द्यावे अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. वाढत्या पेट्रोल,डिझेलच्या दरांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१५ मध्ये केलेल्या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. पेट्रोल डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. हे नशीब कुणाचे आहे अशी टीका मलिक यांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणत आहेत की, पेट्रोलचे दर कमी झाले, डिझेलचे दर कमी झाले की नाही असे मोदींना लोकांना विचाले आहे. लोकं म्हणत आहेत की, मोदी नशीबवान आहे. आता तुम्ही सांगा नशीबावाला पाहिजे की विनानशीबवाला पाहिजे. जर मोदीचे नशीब देशातील जनतेच्या कामासाठी उपयोगी येत असेल तर याहून मोठ्या नशीब काय असेल. नशीबवानमुळे जर पेट्रोल, डिझेलच्या दर कमी होत आहेत तर विनानशीबवानला निवडून आणायची गरज काय आहे? असे मोदींनी २०१५च्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -