घरमहाराष्ट्रमी सादर केलेली वानखेडेंची कागदपत्रे खोटी निघाल्यास मंत्रिपद सोडेन; नवाब मलिकांची रोखठोक...

मी सादर केलेली वानखेडेंची कागदपत्रे खोटी निघाल्यास मंत्रिपद सोडेन; नवाब मलिकांची रोखठोक भूमिका

Subscribe

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासंदर्भातील सादर केलेली कागदपत्रे खोटी निघाली तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, अशी रोखठोक भूमिका राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जाहीर केली आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर बनावट जातीच्या दाखल्याचा आधारावर आयआरएसमध्ये नोकरी मिळवली, असा आरोप केला आहे.

नवाब मलिक यांनी २५ ऑक्टोबरला समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला प्रसिद्ध केला होता. समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. या आरोपांना उत्तर देण्यासाठी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. तसंच, आम्ही हिंदू आहोत हे देखील त्यांनी सांगितलं. परंतु, नवाब मलिक हे त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन, अशी रोखठोक भूमिकाच नवाब मलिक यांनी जाहीर केली.

- Advertisement -

मी आतापर्यंत समीर वानखेडे यांच्यावर जे आरोप केले आहेत, त्या आरोपांवर ठाम आहे. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा ठरल्यास मंत्रिपद सोडायला तयार आहे. मी केलेले आरोप खोटे ठरवून दाखवा, असं आव्हानच मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांना दिलं आहे.

नवाब मालिकांनी जाहीर केला वानखेडेंचा ‘निकाहनामा’

नवाब मालिकांनी बुधवारी सकाळी समीर वानखेडे यांचा निकाहनामा जाहीर केला. ‘स्वीट कपल समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी.’ दरम्यान या लग्नात ३३ हजार रुपयांची मेहर घेण्यात आल्याचे मलिकांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -