घरमहाराष्ट्रवानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितला, ती गुन्हेगार आहे काय?; नवाब मलिक संतापले

वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितला, ती गुन्हेगार आहे काय?; नवाब मलिक संतापले

Subscribe

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी माझ्या मुलीचा सीडीआर रिपोर्ट मुंबई पोलिसांकडे मागितला. माझी मुलगी निलोफर मलिक गुन्हेगार आहे का? असा संतप्त सवाल राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले आहेत.

नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना त्यांचा जावई समीर खान प्रकरणावर बोलताना वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितल्याचं सांगितलं. माझ्या जावयाला खोट्या पद्धतीने जेलमध्ये टाकलं. न्यायालयात लढाई सुरु आहे. माझी मुलगी कागदपत्रांवर काम करत आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये यांचे सीडीआर (Call Detail Record) उपलब्ध करुन द्या, अशी मागणी केली आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

- Advertisement -

काय माझी मुलगी निलोफर मलिक गुन्हेगार आहे? त्यांनी खासगी जीवनातील माहिती मागितली, देशातील कायदा समाजातील सामान्य नागरिकाची खासगी जीवनातील माहिती मिळवण्याचा अधिकारी प्रयत्न करत आहे. आम्हाला वाटतंय समीर वानखेडे मर्यादा ओलांडत आहेत. जर गुन्हेगाराची माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला त्याचा अधिकार आहे. तुम्ही सीडीआर मागा, हिंमत असेल माझी मुलीचा सीडीआर मागा. त्या प्रकरणात देखील कायदेशीर लढाई आम्ही लढणार, असं नवाब मलिक म्हणाले.

समीर वानखेडेंनी जातीचा दाखला जाहीर करावा

मी शेअर केलेलं जन्म प्रमाणपत्र खोटं असेल तर खरं कोणतं आहे हे वानखेडे परिवाराने किंवा समीर वानखेडे यांनी स्वत: समोर येऊन दाखवावं. त्यांचे वडील जातीचं प्रमाणपत्र दाखवत आहेत. समीर वानखेडेंनी जात प्रमाणपत्र जाहीर करावं, असं आव्हान नवाब मलिक यांनी दिलं आहे. तसंच, जर तुम्ही ते जाहीर केलं नाही किंवा सरकारी कागदपत्र नष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे ती माहिती असते. सार्व कागदपत्र आम्ही बाहेर काढत आहोत.लवकरच हे प्रकरण जातपडताळणी समोर जाईल, असं देखील नवाब मलिक यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – समीर वानखेडेंनी जातीचा दाखला जाहीर करावा; नवाब मलिकांचं आव्हान


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -