घरमहाराष्ट्र'जे स्वत:ला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे पवारसाहेब हेच चाणक्य आहेत'...

‘जे स्वत:ला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे पवारसाहेब हेच चाणक्य आहेत’ – नवाब मलिक

Subscribe

सर्व पक्षांची मोट बांधून काँग्रेससह एक नवीन आघाडी तयार होतेय; त्याला एक सामुहिक नेतृत्व देण्याचे काम शरद पवार करत आहेत.

आम्ही ममतादीदी सोबत राहणार की काँग्रेससोबत राहणार याची चिंता काहींना वाटतेय. परंतु जे स्वत: ला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे पवारसाहेब चाणक्य आहेत हे लक्षात घ्यावे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले आहे. या राज्यात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र येतील असे कधी कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते तशीच परिस्थिती या देशात होणार आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

बरेच लोक आहेत जे कधी सोबत येणार याची चर्चा होत नाही परंतु या सगळ्यांची मोट बांधण्याचे काम शरद पवार करतील. कुणालाही यातून बाहेर काढून ही आघाडी होणार नाही. सगळ्यांचा समावेश करायचा आहे यादृष्टीने शरद पवार काम करत आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -

या देशात विविध प्रश्न निर्माण झाल्यावर ज्यापध्दतीने युपीएच्या बैठका झाल्या पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. आम्हाला या देशात ममतादीदी, टीआरएस, सपा, आरजेडी, दक्षिणेतील पक्ष या सर्वांची मोट बांधायची आहे. कॉंग्रेससह एक नवीन आघाडी तयार करायची आहे. सामुहिक नेतृत्व निर्माण करुन ही आघाडी काम करेल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

ममता बॅनर्जी या दोन दिवसाच्या दौर्‍यावर असताना त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आमच्या मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी देशात मोदी सरकारच्याविरोधात असंतोषाचे वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पर्याय देण्याची गरज असल्याचे मत मांडले. त्यावर पवारसाहेबांनी आम्ही सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -