Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी राष्ट्रपती निवडणुकीबाबत रणनिती ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर कळेल, नवाब मलिक यांचं वक्तव्य

राष्ट्रपती निवडणुकीबाबत रणनिती ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर कळेल, नवाब मलिक यांचं वक्तव्य

लोकांना त्रास देण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर स्वतः शरद पवार यांनी आपण राष्ट्रपती पदाचा उमेद्वार होणार नसल्याचे सांगितले आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या रणनितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशातील ५ राज्यांतील निवडणुकीनंतर राष्ट्रपती निवडणुकीबाबत रणनिती कळेल असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं आहे. तसेच भाजपने केंद्रीय यंत्रणांचा कितीही गैरवापर केला तरीही कोण गप्प बसणार नाही असा इशाराच नवाब मलिक यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, राष्ट्रपती पदाची निवडणूकच नाही. पाच राज्यांचे निकाल लागल्यानंतर गणित ते काय असेल तेव्हा रणनितीबाबत सांगता येईल. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत पक्षांतर्गत कुठलीही चर्चा झाली नाही. तसेच इतर पक्षांसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्यामुळे यामध्ये कुठलेही तथ्य नाही. प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची दोनवेळा भेट घेतली हे सत्य आहे. प्रशांत किशोर हे सर्व नेत्यांना भेटतायत याबाबत ते सांगू शकतात. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत अधिक माहिती प्रशांत किशोरच सांगतील आम्ही काही सांगू शकत नाही असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं आहे.

भाजपला जनताच समज देईल

- Advertisement -

भाजप सत्तेत आल्यानंतर सातत्याने जगात पेट्रोलचे भाव कमी होत असताना भारतात मात्र भाववाढ थांबत नाही आहे. याचे मोठं कारण आहे की, कुठेतरी पेट्रोल, डिझेल घरगुती वापरासाठी गॅस याच्यावर अफाट टॅक्स लावून सरकारी तिजोरी भरण्याचे काम सुरु आहे. दरवर्षी ४ लाख कोटी रुपये हे सरकार लोकांच्या खिशातून काढत आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष मोर्चे, आंदोलनं करुन सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करत आहे. एवढं करुन सरकारला जाग येत नाही आहे यामुळे आता जनताच त्यांना समज देईल.

यंत्रणांच्या गैरवापरानंतरही कोण शांत बसणार नाही

भाजपच सरकार आल्यानंतर केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करुन लोकांना त्रास देण्याचं काम सुरु आहे. लोकांना त्रास देण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी या यंत्रणांचा वापर केला जात आहे. एकनाथ खडसेंसह त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत तेच घडत असून अनिल देशमुख आणि त्यांच्याही कुटुंबीयांसोबत तेच घडत आहे. ज्या पद्धतीने लोकांच्या मनात भीती निर्माण होईल आणि लोकं त्यांना समर्थन करतील हे भाजपच्या नेत्यांची चूक आहे. या यंत्रणांचा कितीही गैरवापर झाला तर कोण गप्प बसणार नाही.

- Advertisement -