घरमहाराष्ट्रनवाब मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप, दरेकरांकडून प्रत्युत्तर

नवाब मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप, दरेकरांकडून प्रत्युत्तर

Subscribe

“कोणत्याही मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी राज्यातील आयपीएस, आयएएस अधिकारी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटतात” असा खळबळ जनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज नवाबांच्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. ”सरकार म्हणून तुमच्यावर कोणाचाही विश्वास, विश्वासार्हता नाही आणि आपलं नियंत्रण नाही का असं समजायचं का? असा सवाल दरेकरांनी नवाब मलिक यांना केला आहे. मुंबईत ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

“नवाब मलिक पक्षाअंतर्गत आणि महाविकास आघाडी सरकारअंतर्गत जे काही मतभेद दिवसेंदिवस वाढतायत त्यातना अशाप्रकारचे वक्तव्य करतायत. सरकार पाडण्यासाठी असं कुठलंही खातं प्रयत्न करत नसतं. पण खाई त्याला खवखवे. सरकारमध्य़ेच एवढी अस्वस्थता आहे… असंतोष आहे.. विसंवाद आहे… त्याच्यामुळेच सरकार पडेल या भीतीपोटी अशी वक्तव्य मलिक करतायत” अशी टीकाही दरेकरांनी केली.

- Advertisement -

यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, ब्युरो कार्डस त्याठिकाणी आयएस,आयपीएस असतील. चुकीच्या कामांना जर पाठबळ देत नसतीस, समर्थन करत नसतील तर एवढं निराश व्हायचे कारण नाही. या राज्यातील आयएस, आयपीएस, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातत्याने महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार कोणचेही असे तरी समर्थन देत सकारात्मक भूमिका घेतली आहे. पण तुमचे उद्देशचं जनहिताचे नसतील विकासाचे नसतील…आणि व्यक्तिगत स्वार्थाचे काही निर्णय किंवा पॉलिसी असतील तर अशावेळेला आयएएस, आयपीएस मदत करत नसतात. असंही दरेकर म्हणाले.

“जर चुकीचं होत असेल आणि त्यांच्य़ापर्यंत माहिती जात असेल पण मुद्दामहून कुणी अधिकारी देवेंद्र फडणवीसांना भेटत नाही माहिती देत नाही.” असंही दरेकरांनी सांगितले.

- Advertisement -

“अलिकडच्या काळात भाजपाच्या कुठल्याही जबाबदार नेत्याने सरकार पाडण्याबाबत कुठलही वक्तव्य केलं नाही. सरकारमधीन तीन पक्षांमध्ये एवढा चांगला समन्वय आहे की तेचं एकमेकांना कधी पाडतील हे आपल्याला कळणार नाही.” अशी टीका त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.


नागपूरमध्ये तिसऱ्या लाटेच्या निर्बंधांबाबत दोन कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दुमत !


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -