रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणात सजनानीला गोवण्यात आले, NCBचा बनावटपणा मलिकांनी केला उघड

nawab malik serious allegations on ncb rhea chakraborty case karan sajnani
रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणात सजनानीला गोवण्यात आले, NCBचा बनावटपणा मलिकांनी केला उघड

अभिनेते सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज प्रकरण समोर आलं होते. एनसीबीने कारवाईमध्ये रिया चक्रवर्तीला अटक केली होती. रिया चक्रवर्तीच्या अटकेमध्ये एनसीबीने बनावट केस करुन करण सजनानीलाही गोवण्याचा प्रयत्न करुन फसवलं होते असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. एनसीबीच्या कारवाईवर नवाब मलिक यांनी वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. एनसीबी ड्रग्ज प्रकरणात कलाकरांना समन्स जारी करुन महाराष्ट्र आणि हिंदी सिनेसृष्टीला बदनाम करण्याचे षडयंत्र करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच मलिकांनी जावई समीर खानलाही बनावट प्रकरणात अटक करण्यात आले असल्याचा आरोप केला आहे.

राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर आरोप केला आहे की, रिया चक्रवर्तीच्या केसमध्ये करण सजनानीला गोवण्यात आले. राहीला फर्निचरवालाच्या केसमध्ये टाकण्यात आले. १४ तारखेला जावयाच्या घरी एनसीबी छापेमारी करण्यासाठी गेली होती. तेव्हा माझी मुलगी माझ्या घरी होती. तीने मला सांगितले छापेमारी करण्यात आली मुलीला माझ्या घरुन बोलवण्यात आले. दुपारी सांगण्यात आले की, गांजा सापडला परंतु तशी कोणतीच वस्तू घरात नव्हती. एनसीबी सिलेक्टीव लोकांना बदनाम करण्याचा काम करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

समीर खानच्या अटकेवरुन नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, समीर खानला बनावट प्रकरणात अटक केली आहे. तब्बल ३ महिने एनसीबीने सुनावणीस टाळाटाळ केल्यानंतरही समीर खानची निर्दोष मुक्तता झाली आहे. समीर खानच्या जामीनाचा न्यायालयीन लेखी आदेश न्यायधीशांकडून प्राप्त झाले नव्हते ते काल सकाळी ११ वाजता कोर्टाच्या पोर्टलवर जस्टीस जोगळेंची ऑर्डर लोड झाली. न्यायाधीश जोगळेंची ऑर्डर आल्यानंतर वाचण्यात आली. माझ्या जावयाला ८ महिने कोठडीत राहावं लागले आता निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. परंतु त्याची पत्नी वेगळ्या मानसिक परिस्थितीमध्ये होती. त्यांचे २ मुले आहेत त्यांच्यावरही परिणाम झाला आहे. ते भेटण्यासाठीही तयार नाही. घरातील काही लोकांना सोडल्यास कोणाला भेटत नाही अशी परिस्थिती असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.


हेही वाचा :  drugs case : मलिकांचा जावई समीर खानच्या अडचणी वाढणार, NCBची हायकोर्टात याचिका