घरताज्या घडामोडीNawab Malik vs Sameer Wankhede : अंत्य संस्कारासाठी हिंदू, सरकारी नोंदी मुस्लिम,...

Nawab Malik vs Sameer Wankhede : अंत्य संस्कारासाठी हिंदू, सरकारी नोंदी मुस्लिम, नवाब मलिकांचे ट्विट

Subscribe

धन्य है दाऊद ज्ञानदेव !

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या कुटुंबाशी संबंधित आणखी एक गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडेंच्या आईचे मृत्यूचा दाखला ट्विट करत आणखी एक फर्जीवाडा केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडेंच्या आई झाईदा ज्ञानदेव वानखेडे यांची दोन प्रमाणपत्रे मलिक यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहेत. त्यामध्ये अंतिम संस्कारासाठी एक दाखला आणि सरकारी दस्तावेजासाठी एक दाखला तयार केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी धन्य आहे दाऊद ज्ञानदेव असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

झाईदा वानखेडे यांचे निधन १६ एप्रिल २०१५ रोजी झाले होते. त्यानंतर महापालिकेच्या नोंदी त्यांचा धर्म हा मुस्लिम असल्याचे मृत्यू प्रमाणपत्रात नमुद करण्यात आले आहे. तर सरकारी दस्तावेजात म्हणजे ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत त्यांचा धर्म हा हिंदू असल्याचे नमुद आहे. मृत्यू अहवालात त्यांचा धर्म हिंदू असल्याचा दस्तावेजही नवाब मलिक यांनी ट्विट केला आहे. नवाब मलिक यांनी एका व्यक्तीच्या मृत्यू दाखल्यासाठी दोन प्रमाणपत्रे वापरल्याचा आरोप या माध्यमातून केला आहे. वानखेडेंचा हा आणखी एक फर्जीवाडा असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.

याआधीच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाच्या पत्रिकेपासून ते लग्नाच्या फोटोपर्यंत तसेच जात प्रमाणपत्र याबाबतची अनेक कागदपत्रे उघड केली आहेत. हे सगळे पुरावे त्यांनी ट्विटरवरही दिले आहेत. दरम्यानच्या काळात समीर वानखेडेंची नोकरी जाणार असाही दावा नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडेंनी जात प्रमाणपत्राच्या माध्यमातून नोकरी मिळवली खरी, पण त्यामुळे एका अनुसुचित जातीच्या उमेदवाराची संधी हुकल्याचेही त्यांनी म्हटले होते. समीर वानखेडे सोयीने जातीच्या प्रमाणपत्राचा वापर केल्याचाही दावा मलिक यांनी केला आहे.

- Advertisement -

समीर वानखेडेंचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांना समीर वानखेडे व त्यांच्या कुटूंबीयांशी संबंधित सोशल मिडियावर बोलण्यासाठी मज्जाव करावा, अशी याचिका उच्च न्यायालयात याआधी दाखल केली होती. पण नवाब मलिक यांना बोलण्यापासून मनाई करता येणार नाही, असा निकाल खंडपिठाने दिला होता. तसेच नवाब मलिक यांनाही योग्य ती माहिती घेऊनच बोलण्याची सूचना केली होती. या आदेशाला आव्हान देणारी आणखी एक याचिका ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.


ज्ञानदेव वानखेडेंची मलिकांविरोधात पुन्हा हायकोर्टात याचिका, खंडपीठाच्या निर्णयालाच आव्हान

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -