नवाब मलिक यांना हायकोर्टाकडून कारणे दाखवा नोटीस

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी वानखेडेंची याचिका

Opponents cannot put an end to Gandhiji's ideas - Nawab Malik

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबईचे तत्कालीन प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांबद्दल काहीही आक्षेपार्ह बोलणार नसल्याची लेखी हमी मुंबई उच्च न्यायालयात देऊनही पुन्हा त्याचा भंग करून न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

न्यायालयाला हमी देऊनही त्याचा भंग करून न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने नवाब मलिक यांना ही नोटीस बजावली आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या मानहानी दाव्यातील अर्जावर एकल न्यायमूर्ती पीठासमोर सुनावणी पूर्ण होऊन निकाल येईपर्यंत वानखेडे कुटुंबियांविरोधात कोणतीही विधाने करणार नाही, अशी लेखी हमी नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली होती. तरीही प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप ज्ञानदेव वानखेडे यांनी केला होता.

त्यावर न्यायालयाने तुम्हाला कारणे दाखवा नोटीस का बजावण्यात येऊ नये, अशी विचारणा मलिक यांना केली होती. त्यानंतर मी फक्त माझ्या सरकारी सेवकपदाच्या अधिकारात वक्तव्ये केली. मी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधाने केली नाहीत. यापूर्वी व्यक्त केलेल्या वक्तव्यांविषयी खेद व्यक्त करतो. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. त्याबद्दल मी बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे विधाने करणार नाही, अशी हमी देतो, अशी हमी मलिक यांच्याकडून न्यायालयात देण्यात आली होती.