घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे देशात कोळशाचा तुटवडा, नवाब मलिकांचा भाजपवर घणाघात

पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे देशात कोळशाचा तुटवडा, नवाब मलिकांचा भाजपवर घणाघात

Subscribe

देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे राज्यातील आणि देशातील वीजनिर्मीती संच बंद ठेवण्यात आले आहेत. कोळशाचा तुटवड्यामुळे भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. याला राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळे कोळशाचा तुटवडा निर्माण झाले असल्याचा घणाघात नवाब मलिक यांनी केला आहे. देशात कोळशाचा खाणी असूनही त्या खाणीमध्ये अद्याप खणीकरन सुरु करण्यात आले नाही. यामुळे कोळशाचा तुटवडा निर्माण झाला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी कोळशाच्या तुटवड्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, कोळशाच्या संकटामुळे देशात वीज संकट निर्माण झालं आहे. कोळसा मिळत नसल्यामुळे वीज निर्मिती संच बंद करावा लागत आहे. परदेशातून कोळसा आयात करावा लागत आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

युपीएचे म्हणजेच काँग्रेसचे सरकार असताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भविष्यातील वीजेची गरज लक्षात घेऊन कोळशाच्या खाणी देशातील वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वितरित करण्याची योजना केली होती. यामध्ये भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले. बऱ्याच कंपन्यांचे खाणीचे कंत्राट बंद करावे लागले. त्यानंतर आजच्या घडीला परदेशातून मोठ्या संख्येनं कोळसा आयात करावा लागत आहे. कोळसा आयातीवर मोठ्याप्रमाणात पैसे खर्च होत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

या देशात कोळसा असताना त्याचा वापर करणं, त्याचे नियोजन करणं जमलं नाही. अजून कोळसा खाणी देण्यात आल्या आहेत त्याचे मायनिंग करण्यात आले नाही. हे जे संकट कोळशाचे निर्माण झालं आहे. चुकीच्या धोरणामुळे, देशात कोळसा असताना खदाने कार्यान्वित होत नाहीत. परदेशातून कोळसा मागवून कुठेतरी जास्त पैसे खर्च होत आहे. ज्यांना अर्थव्यवस्था समजत नाही त्यामुळे ही परिस्थिती या देशात निर्माण झाली असल्याची खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारमुळे राज्यावर ही वेळ – बावनकुळे

राज्य सरकार आणि वीजेचा पुरवठा करणाऱ्या तीन कंपन्यांमुळे देशावर ही वेळ आली असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. २८०० कोटी रुपये कोळशाचे थकीत असल्यामुळे राज्यावर अशी वेळ आली असा आरोप केला आहे. ऊर्जा विभागाकडून कोळशाचे नियोजन करण्यात आले नाही. राज्य सरकारने कोळशाचा पुरेसा साठा न केल्यामुळे ही वेळ आली आहे. कोळसा लिफ्टिंगची परवानगी नाकारली असल्यामुळे राज्यात कोळसा तुटवडा निर्माण झाला आहे. महाजन कोलकडे कंत्राटी कामगारांना देण्यासाठी निधी नाही यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गरज पडल्यास महाजनकोलला ५ हजार कोटींचा निधी द्यावा असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारला दिला आहे.


हेही वाचा : ‘मला आजही मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं’ – देवेंद्र फडणवीस


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -