घरताज्या घडामोडीआमची चिंता सोडून फडणवीसांनी स्वतःच्या पक्षाकडे पाहावं, नवाब मलिकांचे प्रत्युत्तर

आमची चिंता सोडून फडणवीसांनी स्वतःच्या पक्षाकडे पाहावं, नवाब मलिकांचे प्रत्युत्तर

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भविष्यवाणी कधीही खरी झाली नाही. त्यांनी आता आमची चिंता करण्याचे सोडून स्वतःच्या पक्षांकडे पाहावं, केंद्रात एनडीएमध्ये कोणी राहत नाही आहे. एनडीए सोडून लोक जात आहेत. त्यामुळे आमची चिंता सोडा आणि गोव्यातील सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करा असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप राहणार नाही असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसी संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. नवाब मलिक म्हणाले की, ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर त्यांचा खाजगी दौरा असताना शिवसेनेच्या नेत्यांना भेटल्या आहेत. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्या आहेत. त्यांची इच्छा होती आम्ही भेटलो. गुजरातचे मुख्यमंत्री आले ते भाजप नेत्यांना भेटले त्याबाबत काही बोलत नाही. वेगळी वागणूक आम्हाला कळत नाही. देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या पक्षाकडे पाहाव एनडीए मध्ये कोण राहत नाही. एनडीए सोडून लोक जात आहेत. आजच्या घडीला ज्या पद्धतीने भाजपविरोधात वातावरण निर्माण झालं आहे. देशातील सर्व विरोधकांची मोट बांधण्याची जबाबदारी पवारांनी घेतली असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आम्ही सर्व राजकीय पक्षांना काँग्रेससोबत एक मोठी आघाडी निर्माण करुन देशाच्या जनतेला एक पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. याची चिंता भाजपला लागल्यानंतर आमच्यात फूट पडलेली आहे हे बोलण्यापेक्षा एनडीएमध्ये कोण राहायला तयार नाही. नितिश यादव कधी सोडून जातील याच्याकडे लक्ष द्या आम्ही एकजुटीने सरकार चालवतो तुमची भविष्यवाणी कधीही खरी झाली नाही. आमची चिंता सोडा आणि आता जबाबदारी गोव्याची आहे सरकार राहिल की नाही याची चिंता करा असा इशारा नवाब मलिकांनी दिला आहे.

पुलवामाची घटना झाल्यानंतर तो आरडीएक्स कुठून आला त्याचा अहवाल सरकारने दिला नाही. पुलवामा नंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्याचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आलं आहे. ७ वर्षे सरकार सत्तेत असतानासुद्धा आतंकवाद संपत नाही. चीनसारखे देश या देशामध्ये नवीन गाव वसवत आहेत. २०१९ साली मोदींच्या कामगिरीत नाही तर पुलवामाच्या घटनेचा भाजपने फायदा घेतला होता. आज सगळ्यात जास्त लोकं भाजपवर नाराज आहेत. २०१९चे उदाहरण देऊ नका आणि २०१४ मध्ये मोदी सरकार राहणार नाही. पहिल्यांदा तीन कायदे घेऊन सरकार कुठेतही झुकत असल्याचे समोर आलं आहे. यामुळे देशात भविष्यात परिवर्तन अटळ असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : ममता बॅनर्जी आणि शरद पवारांना काँग्रेसला बाजूला ठेवायचं आहे – देवेंद्र फडणवीस


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -