घरताज्या घडामोडी'तुमच्याकडे चाणक्य तर आमच्याकडे तालमीतला बाप', नवाब मलिकांचा भाजपवर पलटवार

‘तुमच्याकडे चाणक्य तर आमच्याकडे तालमीतला बाप’, नवाब मलिकांचा भाजपवर पलटवार

Subscribe

राज्यात दिवाळीच्या पुर्वीपासूनच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी थेट भाजप नेत्यांवर घणाघात केला आहे. भाजपकडे चाणक्य असतील तर आमच्याकडे तालमीतला बाप आहे. असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले आहे. भाजप नेत्याकंडून आमच्याकडे राजकारणाचा चाणक्य असल्याचे सांगण्यात आले होते यावर मलिकांनी घणाघात केला आहे. तुमच्याकडे चाणक्य असेल तर आमच्याकडे चाणक्याचा बाप असल्याचे मलिक म्हणाले. सोनपेठ नगर परिषदेचे गटनेते चंद्रकांत राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशादरम्यान मलिकांनी भाजपचा समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. मलिक म्हणाले की, विधानसभेची निवडणूक असताना याच प्रकारचे कारस्थान भाजप वाल्यांनी केले होते. एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे राजकारण संपलेले आहे. पण देवेंद्र फडणवीस तुम्ही शिकताय ना त्या तालमीचा उत्साद, या देशाचा उत्साद आमचे शरद पवार आहेत. तुमचे नेते सांगत आहेत राजकारणाचे चाणक्य परंतु चाणक्याचा बाप आमच्या पक्षाचा नेता आहे. हे तुम्हाला कळाले पाहिजे निश्चित रुपाने आम्ही महाराष्ट्रात कोणाला घाबरणार नाही. कोणाला भीणार नाही, जे घाबरत होते ते इकडे तिकडे गेले आहेत. असे नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांना उद्देशून म्हटलं आहे की, लोकांना झोप येते आम्हाला झोप येते पण आम्ही लोकांची झोप उडवत आहोत. वैचारिक लढाई आपण लढतो आहोत याच लढाईमध्ये आपण सामील झाला आहात. परभणी जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यातील विकासाची कामे पक्षाच्या माध्यमातून आपण नक्की करू. राठोड यांच्या पक्ष प्रवेशानंतर परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल असेही नवाब मलिक म्हणाले आहेत.

यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी

यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सोनपेठ नगर परिषदेचे गटनेते चंद्रकांत राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

- Advertisement -


हेही वाचा: गुजरातच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत नवाब मलिकांचा मोठा बॉम्ब


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -