घरताज्या घडामोडीविधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊ पण १२ आमदार नियुक्त करा, नवाब मलिकांचा...

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊ पण १२ आमदार नियुक्त करा, नवाब मलिकांचा राज्यपालांना टोला

Subscribe

विधानसभा अध्यपदाची निवडणूक घेऊ आणि बहुमतापेक्षा जास्त मताने जिंकू पण त्यापुर्वी १२ आमदारांची नियुक्तीचा प्रश्न निकाली काढा

महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या अधिवेशनाच्या तयारीला राज्य सरकार आणि विरोधक लागले आहेत. परंतु यादरम्यानही एकमेकांवर टोलेबाजी सुरु आहे. विधानसभा अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची तयारी करा अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी टोला लगावला आहे. विधानसभा अध्यपदाची निवडणूक घेऊ आणि बहुमतापेक्षा जास्त मताने जिंकू पण त्यापुर्वी १२ आमदारांची नियुक्तीचा प्रश्न निकाली काढा असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अंतिम निर्णय होईल परंतु आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत सुचवलं आहे. निश्चितरुपाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणं आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात एकमत आहे. दोन दिवसाचं अधिवेशन असलं तरी याच अधिवेशनात कार्यक्रम करता येईल यावर विचारविनिमय सुरू असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यपालांना कानपिचक्या

दरम्यान राज्यपाल विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्ष पदाची निवडणूक लवकर करा असे सूचित करत आहेत मात्र विधानपरिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत तोपण विषय प्रलंबित आहे तो निकाली काढलात तर १२ आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील असे सांगतानाच असा आमचा आग्रह वारंवार राहिला आहे याची आठवणही नवाब मलिक यांनी राज्यपाल यांना आज पुन्हा एकदा करुन दिली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊच पण त्याअगोदर १२ आमदार नियुक्तीचे प्रकरण लवकर निकाली काढा अशी विनंतीवजा आग्रह नवाब मलिक यांनी राज्यपाल यांना केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -