Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी 'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या, नवाब मलिक यांचा केंद्र...

‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या, नवाब मलिक यांचा केंद्र सरकारला टोला

नियमांचे पालन जनतेने केल्याने कोरोना आटोक्यात

Related Story

- Advertisement -

टरच्या ब्लू टीक प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. देशात कोरोनामुळे नागरिकांचा मृत्यू होत असताना केंद्र सरकार ट्विटरशी वाद घालत असल्यामुळे विरोधकांनी चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. ‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील रविवारी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकार ब्लू टीकसाठी लढत आहे. करोना लसीसाठी जनतेला आत्मनिर्भर व्हावे लागेल अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

‘ब्लू टीक’ आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्रसरकारने समजून घ्यावा असे सांगतानाच ‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे. ट्वीटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्रसरकार ‘ब्लू टीक’ ची लढाई लढताना दिसत आहे तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -

ट्वीटरवरील ‘ब्लू टीक’ असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्रसरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्रसरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

काय आहे प्रकरण

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅंडलवर असलेली व्हेरिफाईड ब्लू टीक ट्विटरने काढली होती. परंतु परत ती ब्लू टीक पुन्हा व्यवस्थित करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचेही ट्विटर अनव्हेरिफाईड केले होते. ट्विटरने याबाबत कारण स्पष्ट केले नव्हते. परंतु ब्लू टीक पुन्हा आणल्यानंतर कारण स्पष्ट केले आहे. यावरुन केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस पाठवून नियमांचे पालन करण्याची तंबी दिली आहे. मागील काही दिवसांपासून नियमांच्या वादावरुन ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरु आहे.

नियमांचे पालन जनतेने केल्याने कोरोना आटोक्यात

- Advertisement -

महाराष्ट्रात आणि देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असून सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केल्याने हे घडल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. राज्यात सध्या दहा जिल्हयांना पहिल्या टप्प्यात जास्त सूट देण्यात आली आहे. काही जिल्हयात निर्बंध आहेत तर काही जिल्हयात जास्तच निर्बंध लागू आहेत. लोकांनी सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केले तर लवकरात लवकर आपण कोरोनातून मुक्त होवू असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. जे दहा जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत. त्यातील लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर ते दुसर्‍या किंवा तिसऱ्या टप्प्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून नियमांचे काटेकोर पालन करा असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.

- Advertisement -