दसऱ्यानंतर आगामी निवडणुकांच्या तयारीला लागणार, राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर नवाब मलिक यांचे वक्तव्य

drugs case Ncb goes high court to cancel nawab malik son in law sameer khan bail
दसऱ्यानंतर आगामी निवडणुकांच्या तयारीला लागणार, राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर नवाब मलिक यांचे वक्तव्य

दसऱ्यानंतर आगामी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या पाठी केंद्रीय यंत्रणांचा ससेमीरा लावण्यात येत आहे. परंतु न डगमगता सामना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सणासुदीच्या दिवस असल्यामुळे दुकाने हॉटेलांच्या वेळेत वाढ करण्याबाबत एकमत झाले असून मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली आहे. नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, बैठकीत राजकीय परिस्थितीचा आढावा, पोटनिवडणुकीचा आढावा घेण्यात आला. पुर्वीपेक्षा भाजपच्या ३० जागा त्यातील ७ जागा कमी झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. सगळा आढावा घेतल्यानंतर आगामी ३ ते ४ महिन्यांमध्ये या राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुका होणार आहेत. या ३६ जिल्ह्याची जबाबदारी मंत्र्यांना सोपवण्यात आली असल्याची माही नवाब मलिक यांनी दिली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या माध्यमातून शिबीरे सुरु करण्यात येणार आहेत. मेळावे सुरु करण्यात येणार आहे. यासाठी तयारी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दसरा संपल्यावर कार्यक्रमाची सुरुवात होईल. आणि पूर्ण ताकदीने निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आघाडी आणि युतीच्या बाबत अस्थानिक पातळीवर ज्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती असेल त्या प्रमाणे सगळे अधिकार खालच्या पातळीवर देण्यात येणार आहे. पदाधिकारी पालकमंत्री याबाबतचा आढावा घेऊन अहवाल राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सादर करतील आणि त्याच्या नंतर हा निर्णय होणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

यंत्रणांना समोरे जाणार

महाराष्ट्रात ज्या पद्धतीचे चित्र दिसतं आहे. राजकीय लोकांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. आयटी विभाग, ईडी विभाग आहे. राजकारणातील जवळच्या लोकांना त्रास देण्याचा काम सुरु आहे. परंतु कितीही भाजप किंवा केंद्राने हल्ले चढवले केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला तरीही कार्यकर्ते डगमगणार नाही. पूर्ण ताकदीने नेते यंत्रणांचा सामना करतील असे ठरवलं असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न

आगामी दिवसात सणांचे दिवस येत असताना दुकान उघडण्यासाठी वेळेची मर्यादा शिथिल करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरु, व्यापारी, उध्योगधंदे दिलासा देण्यासाठी निर्णय घेऊ असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : तेल, साखरेसह धान्य नाममात्र दराने देऊन दिवाळी गोड करा, भातखळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र