घरताज्या घडामोडीसीरमला कोण बदनाम करतंय याचा शोध केंद्र सरकारने लावला पाहिजे - नवाब...

सीरमला कोण बदनाम करतंय याचा शोध केंद्र सरकारने लावला पाहिजे – नवाब मलिक

Subscribe

देशातील कोरोना लस उत्पादित कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अदर पुनावाला यांनी आपल्याला धमक्या मिळाले असल्याचे एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. अदर पुनवाला यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने देशात एकच खळबळ माजली आहे. यावर राजकीय पडसाद उमटताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सीरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांना कोण बदनाम करत आहे. याचा शोध केंद्र सरकारने घेतला पाहिजे असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. अदर पुनावाला यांना कोणी धमकी दिली केंद्र सरकारने त्यांना वाय दर्जाचा सुरक्षा दिली आहे. असे बरेच प्रश्न काँग्रेसकडूनही उपस्थित करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, देशात सीरम व भारत बायोटेकला लस निर्मितीचे लायसन्स देण्यात आले आहे. मात्र सीरमला कोण बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा शोध केंद्र सरकारने लावला पाहिजे. आता देशात जनजागृती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लस उत्पादित झाली पाहिजे. या लसीचे उत्पादन वाढवणे हे सरकारचे काम असताना त्यांचीपण जबाबदारी आहे की लसीच्या उत्पादनाकडे लक्ष दिले पाहिजे. सुरुवातीला केंद्राला दीडशे, राज्याला आधी ४०० रुपये नंतर स्वतःच ट्विट करून ३०० रुपये दर अदर पूनावाला यांनी जाहीर केला. हे सगळं जनतेच्या मनात संदिग्धता निर्माण करणारं आहे. मात्र त्यांनी कोणीही बदनाम करत नसल्याचे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

देशात लसींचा मोठा तुटवडा आहे. देशात एकच कंपनी केंद्राला वेगळ्या दरात आणि राज्याला वेगळ्या दरत लस विकते आहे. एकच कंपनी तिन दर कसे लावू शकते असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानेही केला आहे. न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे केंद्राने देशात लक्ष दिले पाहिजे अनेक नागरिकांकडे आधार नाही, कागद नाहीत. केंद्र सरकारने प्रत्येकाला लस मोफत दिली पाहिजे. तसेच आपल्या देश अडचणीत असून दुसऱ्या देशांना कोरोना लस पुरवणे योग्य नव्हते. फक्त माझी पब्लिसिटी होईल यासाठी काम करणार हे वागणे योग्य नाही अशी टीका राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -