घरताज्या घडामोडी'माझ्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना चहासह बिस्कीट देणार', नवाब मलिकांच्या सूचक ट्विटमुळे चर्चांना...

‘माझ्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना चहासह बिस्कीट देणार’, नवाब मलिकांच्या सूचक ट्विटमुळे चर्चांना उधाण

Subscribe

घरी पाहुणे येणार असून त्यांच्यासाठी चहा आणि बिस्कीट तयार ठेवलं आहे. त्यांची मी आतुरतेने वाट पाहत असल्याचे सूचक ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे. नवाब मलिकांच्या या ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणेची धाड पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मलिकांच्या घरी ईडी छापेमारी करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. नवाब मलिक एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सूचक ट्वीट केलं आहे. नवाब मलिकांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, माझ्या घरी काही सरकारी पाहुणे येणार अशल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी मी तयार आहे. त्यांचा पाहुणचार करण्यासाठी चहा आणि बिस्कीटही तयार आहेत. त्यांना माझ्या घरचा पत्ता पाहिजे असेल तर त्यांनी मला थेट फोन करावा असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

फडणवीसांना केंद्रीय यंत्रणांचे ओएसडी करावं

नवाब मलिक यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. फडणवीस यांना केंद्रीय यंत्रणांचे ओएसडी कराव अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. मलिक म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री माझ्या विरोधात केंद्रीय यंत्रणांचा ससेमीरा लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माझा त्यांना सल्ला आहे की, त्यांनी केंद्रीय यंत्रणांचे ओएसडी व्हावे त्यांना नियुक्तीचा चांगला अनुभव आहे. तसेच किरीट सोमय्या यांना त्यांचे प्रवक्ते करावे असं खोचक ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे.

- Advertisement -


हेही वाचा : तीन चिलखत दूर करुन लढा आम्ही छातीवर वार करणारे आहोत, राऊतांचा भाजपवर घणाघात


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -