घरताज्या घडामोडी'हॉटेल द ललित'मध्ये अनेक गुपितं, नवाब मलिकांच्या ट्विटचा उलगडा रविवारी होणार

‘हॉटेल द ललित’मध्ये अनेक गुपितं, नवाब मलिकांच्या ट्विटचा उलगडा रविवारी होणार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक मागील काही दिवसांपासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. यासोबत राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ड्रग्ज संबंधी आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी आता नवे ट्विट केलं असून हॉटेल द ललितमध्ये अनेक गुपितं लपले असल्याचा दावा केला आहे. मलिकांच्या या ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी नवं ट्विट करुन अनेकांना विचार करायला लावलं आहे. नवाब मलिकांनी राज्यातील नागरिकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी पुढे म्हटलं आहे की, ‘हॉटेल द ललित’मध्ये अनेक गुपितं लपली आहेत. याचा उलगडा करण्यासाठी रविवारी भेटू’ आशा आशयाचे ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे. मलिकांच्या ट्विटमुळे चर्चा आणि तर्क वितर्क लढवले जात आहेत. नवाब मलिक आता कोणता आरोप करणार तसेच कोणता गौप्यस्फोट करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस नीरज गुंडेंच्या माध्यमातून वसुली करत होते. तसेच फडणवीसांच्या आशिर्वादाने राज्यात ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट सुरु होता. नीरज गुंडे हे अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सक्रिय होते आणि तेच वसुली करून द्यायचे असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. फडणवीसांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळले असून नीरज गुंडे हे माझ्या पेक्षा जास्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले असल्याचे फडणवीसांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर नवाब मलिक म्हणाले… कोणाच्यात हिंमत


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -