Nawab Malik Vs Sameer Wankhede: यह क्या किया तुने? म्हणतं नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या ‘निकाह’चा केला फोटो शेअर

Nawab Malik Vs Sameer Wankhede malik tweets of wankhedes nikah picture
Nawab Malik Vs Sameer Wankhede: यह क्या किया तुने? म्हणतं नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या 'निकाह'चा केला फोटो शेअर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यामधील वाद काही कमी होताना दिसत नाही. पुन्हा एकदा नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. नवाब मलिकांनी काल, रविवारी नव्या ट्वीटमध्ये समीर वानखेडे यांच्या निकाहाचा फोटो शेअर केला. या फोटोद्वारे नवाब मलिक समीर वानखेडेंचा इस्लामनुसार निकाह पार पडल्याचा दावा करत आहेत.

समीर वानखेडे यांच्या निकाहचा फोटो शेअर करत नवाब मलिक म्हणाले की, ‘कबूल है, कबूल है, कबूल है…
यह क्या किया तुने समीर दाऊत वानखेडे?’

यापूर्वी समीर वानखेडेंच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी दोन फोटो ट्वीट केले होते. ते फोटो समीर वानखेडे यांच्या रेस्टॉरंट आणि बारचे होते. पहिल्या फोटोमध्ये नवाब मलिक यांच्या ट्वीटचा स्क्रीन शॉट आहे, तर दुसऱ्यामध्ये क्रांती रेडकर यांनी त्या बारबाबत माहिती दिली आहे. तसेच क्रांती रेडकर यांनी मलिकांवर निशाणा साधण्यासाठी त्यांच्या शब्द ‘फर्जीवाडा’चा वापर केला आहे. क्रांती रेडकर म्हणाल्या की, ‘पहिल्या फोटोमध्ये बार असल्याचा दावा केला आहे. दुसऱ्या फोटोमध्ये सदगुरू फॅमिली रेस्टॉरंट आणि बार दिसत आहे. म्हणजेच मलिकांचा दावा चुकीचा आहे, हा एक बार आहे पण फॅमिली रेस्टॉरंटसुद्धा आहे. पुन्हा एकदा ‘फर्जिवाडा’. या लोकांचा कितीवेळा पर्दाफाश केला आहे. जबाबदार पदावर बसून असे प्रकार करत आहेत. हे सर्व समीर वानखेडेंच नाव बदनाम करण्यासाठी सुरू आहे.’


हेही वाचा – Amravati violence: अमरावतीमध्ये हिंसाचारावर एकतर्फी कारवाई करत भाजप नेत्यांना अटक, फडणवीसांचा आरोप