घरताज्या घडामोडीकंगनाच्या सुरक्षेत कितीही वाढ केली तरी कायदेशीर कारवाई होणारच, नवाब मलिकांचे वक्तव्य

कंगनाच्या सुरक्षेत कितीही वाढ केली तरी कायदेशीर कारवाई होणारच, नवाब मलिकांचे वक्तव्य

Subscribe

अभिनेत्री कंगना रणौतविरोधात शीख समजाविरुद्ध सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे शीख समाजाने कंगनाविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. कंगनाने नुकतेच देशाच्या स्वातंत्र्याबाबत वक्तव्य केलं होते. यामुळे कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देशभरातून होत आहे. दरम्यान कंगनाला केंद्राकडून सुरक्षा कवच देण्यात आले आहे. परंतु कितीही सुरक्षा कवच दिले तरी तिच्यावर कायदेशीर कारवाई होणार असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर घणाघात केला आहे. कंगणावर कायदेशीर कारवाई होणारच असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. तसेच कायदेशीर कारवाईपासून केंद्राचे सुरक्षा कवचही वाचवू शकत नाही असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

अभिनेत्री कंगना रणौतवर शीख समाजाने गुन्हा दाखल केल्यानंतर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक म्हणाले की, कंगना रणौतचे आक्षेपार्ह वक्तव्य सुरुच आहेत. कधी महात्मा गांधींचा अपमान करत आहे. तर कधी वेगवेगळ्या समाजाला आतंकवादी म्हणून संबोधत आहे. हे आता कोणत्याही समाजाला सहन होणार नाही. शीख समाजाच्या लोकांनी खार पोलीस स्टेशनमध्ये कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल केली आहे. निश्चितपणे कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान केंद्र सरकारने कंगना रणौतला कितीही संरक्षण दिले, झेड सुरक्षा दर्जाचे संरक्षण दिले तरी कायद्याने शिक्षा दिली तर त्याला संरक्षण कवच काहीही करु शकत नाही. वारंवार कंगना कायद्यावरुन वक्तव्य करत आहे. त्यामुळे कंगनावर कारवाई होणारच असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ज्ञानदेव वानखेडेंची मलिकांविरोधात पुन्हा हायकोर्टात याचिका, खंडपीठाच्या निर्णयालाच आव्हान


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -