घरताज्या घडामोडी"मविआ"मध्ये संभ्रमावस्था नाही पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न, नवाब मलिक यांची भाजपवर टीका

“मविआ”मध्ये संभ्रमावस्था नाही पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न, नवाब मलिक यांची भाजपवर टीका

Subscribe

भाजपच्या दबावतंत्रामुळे हे आरोप करण्यात आले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही सुरळीत आहे. भाजपकडून अफवा पसरवण्यात येत आहेत. राष्ट्रवादीच्या बैठकीत विधानसभा अधिवेशन, महामंडळ आणि अनिल देशमुख यांच्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. अधिवेशनात कोणत्या विषयांवर चर्चा आणि अधिवेशनाबाबत तयारी करण्याबाबत चर्चा झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेली कारवाई ही राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी सुरु असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सर्व मंत्री यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या संघटनवाढीची चर्चा झाली. महामंडळाच्या वाटपाबाबत चर्चा झाली. लवकरात लवकर त्यावर नियुक्तीबाबत विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर चर्चा करण्यात येणार आहे. अधिवेशन असताना २ दिवसात काही प्रश्न, मुद्दे येतील ते सगळे आमदार येणार का? किती आमदार कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि किती नेगिटिव्ह याबाबत माहिती घेण्यात येत आहे. तसेच विधानसभा अध्यक्षणाची निवडणूक व्हावी अशी आपेक्षा आहे. परंतु जोपर्यंत कोविडच्या चाचण्या आणि रिपोर्य समोर येत नाही तपोर्यंत निर्णय घेता येणार नाही अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

- Advertisement -

सरकार व्यवस्थित काम करत आहे. ज्याप्रकारे भाजपचे लोकं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. सरकारमध्ये समन्वय आहे. तिन्ही पक्ष ताळमेळ नसल्याचे वृत्तात कोणतही तथ्य नाही. जे काही मुद्दे असतील त्यावर उत्तर देण्यासाठी सर्वांची तयारी झाली आहे. अधिवेशनात सगळ्यांना सामोरे जाऊ असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या दबावतंत्रामुळे हे आरोप करण्यात आले

अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. पहिल्या राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे. ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे तो बदला घेण्याच्या भावनेने केला आहे. भाजपच्या दबावतंत्रामुळे हे आरोप करण्यात आले आहे. ईडीच्या तपासातही स्पष्ट दिसत आहे की, अनिल देशमुख यांना त्रास देण्याचा काम तपास यंत्रणांकडून सुरु आहे. अनिल देशमुख यंत्रणांना सहकार्य करत आहेत. जी माहिती हवी ती देशमुख यंत्रणांना देतील. सरकारला, पक्षाला, नेत्यांना बदनाम करणे हे भाजपचे उद्योग सुरु आहेत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -