मलिक यांना बोलण्याचा अधिकार मात्र, माहितीची पडताळणी करावी ; मुंबई हायकोर्टाचे निर्देश

Nawab malik said without congress never options against BJP in the country
भाजपविरोधात काँग्रेसशिवाय विरोधकांची मोट बंधण अशक्य, नवाब मलिकांचे वक्तव्य

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि कुटुंबियांवर आरोप करण्यापासून रोखण्याची मागणी मुंबई हायकोर्टाने सोमवारी फेटाळून लावली. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य करण्यास किंवा सोशल मीडियावर कोणतीही माहिती प्रकाशित करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना मनाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र, कोर्टाने नवाब मलिक यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, कोणत्याही अधिकार्‍याबद्दल कोणतेही विधान करण्यापूर्वी माहितीची पडताळणी केली पाहिजे, असे हायकोर्टाने सांगितले.

नवाब मलिक यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असे या टप्प्यावर म्हणणे योग्य ठरणार नाही. नवाब मलिक पोस्ट करू शकतात. परंतु कोणतीही गोष्ट पूर्ण पडताळणीनंतरच पोस्ट करावी. या प्रकरणी पुढील सुनावणी आता २० डिसेंबरला होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला. त्यांनी लिहिले, सत्यमेव जयते, अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहणार. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर खंडणी, जात प्रमाणपत्रातील तफावत असे अनेक आरोप केले आहेत. मात्र, एनसीबीच्या अधिकार्‍याने अनेक वेळा हे आरोप फेटाळून लावले आहेत.