Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मोदी सरकारविरोधात विरोधकांना एकत्रित आणण्याचा पवारांचा अजेंडा, नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

मोदी सरकारविरोधात विरोधकांना एकत्रित आणण्याचा पवारांचा अजेंडा, नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

भाजप आशेवर दररोज एक एक नवीन विषय समोर आणून आज सरकार पडणार उद्या सरकार पडणार अशी भविष्यवाणी करत आहेत

Related Story

- Advertisement -

केंद्रातील मोदी सरकारविरोधात मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शरद पवारांच्या दिल्लीवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित आणण्यासाठी शरद पवार दिल्लीत गेले आहेत. सुरुवातील प्रमुख पक्षांसोबत चर्चा सुरु असून हळूहळू सर्व विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार ५ वर्षांचा कालावधी पुर्णपणे काढेल असा विश्वासच नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. विरोधी पक्षांची भविष्यवाणी खरी होणार नाही असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार दिल्ल्ती दाखल झाले असून आज दुसऱ्यांना पवारांनी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. या भेटीत दोघांमध्ये जवळपास ३ तासपेक्षा अधिक वेळ चर्चा झाली आहे. शरद पवार यांनी सर्व विरोधकांना एकजूट करणं हाच अजेंडा ठरवला आहे. सुरुवातीला मोजके पक्ष सोबत असणार आहेत. हळूहळू सर्व विरोधी पक्षांना एकत्र कसे आणता येईल याबाबतीत सर्व नेते मिळून चर्चा करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

भाजपची भविष्यावाणी खरी ठरत नाही

- Advertisement -

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षे काम करणार आहे. भाजप आशेवर दररोज एक एक नवीन विषय समोर आणून आज सरकार पडणार उद्या सरकार पडणार अशी भविष्यवाणी करत आहेत. परंतु यांची एकही भविष्यवाणी खरी ठरत नाही. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर बनवण्यात आलं आहे. सरकारमधील नेते काम करत आहेत. सरकार समाधानी आहे. हे सरकार पुर्णपणे ५ वर्षांचा कालावधी पुर्ण करेल असा विश्वास अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

पवार – किशोर भेट

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर याच्यात दुसऱ्यांदा भेट झाली आहे. शरद पवार यांच्या ६ जनपथ निवासस्थानी बैठक झाली आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक मंगळवार २२ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मोदी सरकारविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, पीसी चाको या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -