Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी विरोधी पक्षातील राजकीय व्यक्तींना पशु-पक्ष्यांची नावे देणे भाजपची संस्कृती, नवाब मलिक यांचा...

विरोधी पक्षातील राजकीय व्यक्तींना पशु-पक्ष्यांची नावे देणे भाजपची संस्कृती, नवाब मलिक यांचा घणाघात

भाजपकडून नेत्यांना देण्यात येणारी नावे जनता कधीच सहन करणार नाही.

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षातील राजकीय व्यक्तींना पशु-पक्ष्यांची नावे देणे भाजपची संस्कृती असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मत्री नवाब मलिक यांनी केली आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री विरोधी पक्षांच्या लोकांना प्राण्यांची नावे देतात तर राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षातील नेत्यांना पक्ष्यांची नावे देतात यावरुन त्यांची संस्कृती कळते अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे. भाजपकडून हिणवलं जात असल्याचे जनता कधीच सहन करणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, विरोधी पक्षातील राजकीय व्यक्तींना पशु-पक्ष्यांची नावे देणे ही भाजपचीच संस्कृती आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना पक्ष्यांची उपमा दिली असून भाजपच्या या कृतीला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

- Advertisement -

भाजपचे अमित शहा विरोधी पक्षांच्या लोकांना साप, विंचू, तर कधी कुत्रा बोलत आहेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना पक्ष्यांची उपमा देत आहेत यावरुन त्यांची सवय आणि संस्कृती समोर येत असल्याचा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. भाजपकडून नेत्यांना देण्यात येणारी नावे जनता कधीच सहन करणार नाही. यामुळे भाजपचं जे सुरु आहे ते जास्त दिवस सुरु राहणार नाही असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -