Cruise Drug Bust: पार्थ पवारांच्या क्रूझ पार्टीतल्या सहभागावर NCB चा मोठा खुलासा

NCB and nawab malik

राष्ट्रावादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर आरोप केल्यानंतर NCB ने या संपुर्ण आरोपांवर आपली बाजू मांडली आहे. आम्ही अतिशय प्रोफेशनल एजन्सी असून आम्ही आमचे काम अतिशय काटेकोरपणे करत असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. त्याचवेळी नवाब मलिक यांनी केलेले आरोप हे निराधार असल्याचेही एनसीबीकडून सांगण्यात आले. आम्ही कॉर्डिलिया क्रूझवरून एकुण १४ जणांना चौकशीसाठी ताब्यात आणले होते. त्यापैकी ८ जणांना आम्ही अटक केली. उर्वरीत ६ जणांना कोणत्याही पुराव्याअभावी आम्ही सोडून दिले आहे. पण या प्रकरणात त्या ८ जणांचीही चौकशी सुरू असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. (NCB clarified on nawab malik allegation and involvement of parth pawar at cardilia drugs case)

नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोडून काढताना एनसीबीने स्पष्ट केले की, एनसीबीच्या कारवाईत कॉर्डिलिया क्रूझवरून एकुण १४ जणांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले होते. पण त्यापैकी ६ जणांविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. तर उर्वरीत ८ जणांकडे पुरावे सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली. उर्वरीत ८ जणांकडे कोणतेही पुरावे न सापडल्याने त्यांना सोडून देण्यात आल्याचेही एनसीबीने स्पष्ट केले. आम्ही या प्रकरणात दोन स्वतंत्र साक्षीदारांची मदत घेतली होती. त्यामध्ये किरण गोसावी आणि मनिष भानुशालीचा समावेश होता. पण या क्रूझवरील ऑपरेशनच्या आधी आम्ही कोणालाही भेटलो नसून त्यांना ओळखतही नव्हतो असे एनसीबीने स्पष्ट केले. ज्या पद्धतीने साक्षीदार माहिती देतात त्या आधारावर जबाब नोंद केले जातात. पंचनामे हे वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या पत्त्यावर झाल्याचेही एनसीबीने स्पष्ट केले. नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या नेत्यांचे फोन आल्याच्या आरोपावरही एनसीबीने स्पष्टीकरण दिले आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचे फोन तपासण्याची मागणी केली होती. पण यावर खुलासा करताना एनसीबीने स्पष्ट केले की, आम्हाला न्यायालय जसे आदेश देईल त्यानुसार आम्ही यापुढची कारवाई करू असेही एनसीबीने स्पष्ट केले.

पार्थ पवारांवर काय म्हणाली एनसीबी

कॉर्डिलिया क्रूझवरून एकुण १४ जणांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले होते. त्यापैकी ८ जणांना अटक करण्यात आले. तर उर्वरीत सहा जणांना सोडून देण्यात आले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पार्थ पवार यांचे नाव या सहा जणांमध्ये होते का ? असा सवाल केला. त्यावर एनसीबीने स्पष्ट केले की आम्ही कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेल्या लोकांची नावे सार्वजनिकरीत्या जाहीर करू शकत नाही. आम्ही अतिशय प्रोफेशनल विभाग असून तरूणांना नशेच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी आम्ही प्रामुख्याने काम करत असल्याचे एनसीबीने सांगितले.