घरमहाराष्ट्रNCB Raid : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी अनन्या पांडेच्या घरी एनसीबीची धाड

NCB Raid : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी अनन्या पांडेच्या घरी एनसीबीची धाड

Subscribe

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर आता मुंबईत एनसीबीचे धाड सत्र सुरु झाले आहे. सध्या एनसीबीच्या टीमने मुंबईतील वांद्रे आणि अंधेरी अशी दोन ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. अंधेरीत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या घरी एनसीबीने धाड टाकली आहे. अनन्या पांडे आर्यन खानच्या संपर्कात असल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली होती. त्यानुसार ड्रग्ज प्रकरणाच्य़ा चौकशीचा समन्स देण्यासाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडेच्या घरी पोहचले आहेत. एनसीबीने अनन्या पांडेला आज दुपारी २ वाजता ड्रग्ज प्रकरणातील चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय एनसीबी अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेचा मोबाईल फोन ताब्यात घेतला आहे.

- Advertisement -

एनसीबी अधिकारी बी.बी सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली एनसीबीची एक टीम बॉलिवूड अभिनेता शाहरुखनच्या मन्नत बंगल्या पोहचली आहे तर दुसरी टीम अनन्या पांडे हिच्या घरी पोहचली आहे. आर्यन खानच्या ड्रग्स चॅटमध्ये अनन्या पांडे सोबत आर्यन खानची बहीण सुहाना खानचेही नाव समोर आले आहे. बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे आणि सुहाना खान दोघी चांगल्या मैत्रीणी आहेत. त्यामुळे अनन्या शाहरुखल देखील चांगल्याप्रकारे ओळख होती. अनेकदा पार्टीसमध्ये अनन्या, सुहाना एकत्र दिसल्या होत्या.  यामुळे एनसीबीने अनन्या पांडेच्या घरी छापेमारी केली. तर आल्यानंतर एनसीबीची एक टीम शाहरुख खानच्या मन्नतच्या घरी पोहोचली, जिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे. सर्च ऑपरेशनसाठी शाहरुख खानच्या घरी पोहोचलेल्या एनसीबी टीमचे अनेक फोटो समोर आले आहेत.

- Advertisement -

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली आहे. तो सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. मात्र अटकेनंतर आर्यन खानच्या वकीलांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यात २० ऑक्टोबरच्या सुनावणीदरम्यानही अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आर्यन खानच्या वकीलांनी जामीनासाठी हायकोर्टात अपील केली आहे.

अशातच आता आर्यनच्या हायकोर्टात जामीनासाठीच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी पार असल्याचे हायकोर्टाने जाहीर केले. तसेच आर्यनची एनसीबी कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आजही त्याला कोर्टासमोर हजर केले जाईल. यानंतर कोर्टाच्या निर्णयानुसार आर्यनचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार की संपणार हे स्पष्ट होईल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -