घरताज्या घडामोडीआर्यन खानविरोधात एनसीबी, सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत

आर्यन खानविरोधात एनसीबी, सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत

Subscribe

कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर एनसीबीच्या छाप्यादरम्यान ड्रग्स जप्त

मुंबई – क्रूझ ड्रग्स प्रकरणी जामिनावर बाहेर आलेला अभिनेता शाहरूख खानच्या मुलाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) करत आहे. त्यामुळे आर्यन खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एनसीबी अधिकारी आर्यन खानच्या जामिनाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील दाखल करायचे की नाही यावर विचार करत आहेत, असे एनसीबीतर्फे सांगण्यात आले आहे. सध्या एनसीबी मुंबई हायकोर्टाच्या जामीन आदेशाची तपासणी करून कायदेशीर मत घेत आहे.

मुंबई हायकोर्टाच्या १४ पानांच्या सविस्तर आदेशात, प्रथमदर्शनी आर्यन खान आणि इतर आरोपींविरुद्ध असा कोणताही सकारात्मक पुरावा आढळून आलेला नाही की त्यांनी गुन्हा करण्याचा कट रचला होता असे म्हटले आहे. आर्यन खानच्या मोबाईलवरून घेतलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समध्ये इतर आरोपींनी गुन्हा करण्याचा कट रचला होता, असे दाखवण्यासाठी काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, असे कोर्टाने म्हटले.

- Advertisement -

एनडीपीएस कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) नोंदवलेले आर्यन खानचे कबुलीजबाब केवळ तपासाच्या उद्देशाने विचारात घेतले जाऊ शकते, असेही आदेशात म्हटले आहे. आरोपीने एनडीपीएस कायद्यांतर्गत कोणताही गुन्हा केला आहे, असा निष्कर्ष काढण्यासाठी हे शस्त्र म्हणून वापरले जाऊ शकत नाही, असे जामीन आदेशात नमूद करण्यात आले होते.

२ ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणार्‍या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर एनसीबीच्या छाप्यादरम्यान ड्रग्स जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी आर्यन खानला दीर्घ चौकशीनंतर ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने २८ ऑक्टोबरला अनेक अटींसह जामीन मंजूर केला होता. न्यायमूर्ती एन डब्ल्यू सांबरे यांच्या एकल खंडपीठाने २८ ऑक्टोबर रोजी आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धमेचा यांना १ लाख रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला होता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -