घरताज्या घडामोडीनवाब मलिकांनी नावे उघड केल्यामुळे NCB पंचाच्या जीवाला धोका, पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

नवाब मलिकांनी नावे उघड केल्यामुळे NCB पंचाच्या जीवाला धोका, पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

Subscribe

“माझे नाव उघड केल्यामुळे जीवाला धोका आहे, मला सुरक्षा देण्यात यावी, अश्या आशयाचे पत्र क्रूझ प्रकरणातील एका साक्षीदाराने भोईवाडा पोलिसांना पाठवले आहे. याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात एनसीबीच्या कामावर संशय व्यक्त करून काही साक्षीदारांची नावे उघड करून राज्यात खळबळ उडवून दिली होती. एनसीबीच्या कारवाईत या खाजगी लोकांचे काय काम होते, हे खाजगी लोक आरोपींना कसे काय हाताळू शकतात असा सवाल केला होता. याच्यावर एनसीबीचे अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन हे लोक क्रूझ प्रकरणातील गुन्ह्यातील पंच/स्वतंत्र साक्षीदार असून असल्याचे स्पष्ट केल्यानंतर मलिक यांनी आणखी एका व्यक्तीचे फोटो व्हायरल करून हे व्यक्ती एनसीबीच्या तीन गुन्ह्यात पंच कसे राहू शकतात असाही सवाल उभा करून या पंच/ साक्षीदारांचे नाव उघड केले होते.

- Advertisement -

दरम्यान या साक्षीदाराने रविवारी भोईवाडा पोलीस ठाण्याला एक पत्र पाठवून मी गुन्हयातील पंच / साक्षीदार असून नवाब मलिक यांनी माझे नाव उघड करून माझे छायाचित्रे प्रसिद्ध केल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असून मुंबई पोलिसांनी मला सुरक्षा द्यावी असे पत्रात म्हटले आहे. याबाबत पत्र आले असल्याला पोलीस उप आयुक्त विजय पाटील यांनी दुजोरा दिला असून याबाबत चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा : अमली पदार्थ विरोधी कारवाईत राष्ट्रवादीचा अडथळा आणण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याचा आरोप

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -