घरताज्या घडामोडीNCB च्या समीर वानखेडेंच्या हेरगिरीच्या तक्रारीनंतर, मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये

NCB च्या समीर वानखेडेंच्या हेरगिरीच्या तक्रारीनंतर, मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये

Subscribe

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडून आपला पाठलाग होतानाच, हेरगिरी केली जात असल्याची तक्रार राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे करण्यात आली होती. आता या प्रकरणात मुंबई पोलिस आयुक्त एक्शन मोडमध्ये आले आहेत. समीर वानखेडेंच्या तक्रारीनंतर आता मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या एका अधिकाऱ्यासोबत मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली होती. त्यानंतरच हेरगिरीच्या प्रकरणात आता सूत्रे हलल्याची चर्चा आहे. (NCB sameer wankhede meets mumbai police commissioner, hemant nagrale ordered enquiry)

समीर वानखेडे आणि एनसीबीचे उपसंचालक अशोक जैन हेदेखील नुकतेच मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना भेटले. आपल्यावर दोन जणांकडून पाळत ठेवली जात असल्याची लेखी तक्रार वानखेडे यांनी पोलिसांना दिली. या तक्रारीची तत्काळ देखल मुंबई पोलिसांनी या प्रकरणात लेखी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता मुंबई पोलिसांकडून चौकशीला वेग येईल असे अपेक्षित आहे.

- Advertisement -

काय आहे तक्रार ?

एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. तसेच छोट्या छोट्या हालचालींवर लक्ष ठेवत पाठलाग केला जात असल्याचा आरोपही समीर वानखेडे यांनी केला आहे. या प्रकरणात पाळत ठेवण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेजही असल्याचा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे. या संपुर्ण प्रकरणात धक्कादायक असे गौप्यस्फोटही वानखेडे यांच्याकडून करण्यात आले. पाठलाग करत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज हे हाती लागल्याचे वानखेडे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना सांगितले आहे.

समीर वानखेडे यांनी एनसीबीचे महासंचालक अशोक जैन यांच्यासह पोलिस महासंचालक संजय पांडे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी मुंबई पोलिसांचे दोन कॉन्स्टेबल हे आपल्या मागावर असल्याची लेखी तक्रार डीजीपींकडे दिली. सोमवारी झालेल्या भेटीत आपल्यावर हेरगिरी होत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज असल्याचेही समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे डीजीपींकडूनही या प्रकरणी गंभीर दखल घेतली असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिस महासंचालकांकडून मुंबई पोलिस आयुक्तांना आदेश दिल्याचे समजते.

- Advertisement -

हेही वाचा – NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर पोलिसांची पाळत, वानखेडेंची DGPकडे तक्रार


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -