Thursday, June 10, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हात १० वाजून १० मिनिटंच का दाखवली जातात? जाणून घ्या...

राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हात १० वाजून १० मिनिटंच का दाखवली जातात? जाणून घ्या त्यामागचा किस्सा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस आज २२ व वर्धापनदिन साजरा केला जात आहे. सोनिया गांधी यांच्या काँग्रेसमधील उदयानंतर वेगळी चूल मांडत शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या राजकारणात किंगमेकर ठरला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवार यांनी १० जून १९९९ रोजी पक्षाची स्थापना केली. नवा पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षासाठी नवं चिन्ह देखील निश्चित करण्यात आलं. आज आपण जे राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह पाहतो त्या घड्याळात १० वाजून १० मिनिटं झालेलं दिसतं. यामागे एक किस्सा आहे, इतिहास आहे. तसंच घड्याळ चिन्ह निश्चित होण्यामागे पण एक किस्सा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती छगन भुजबळ यांच्यावर. स्थापनेनंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली मूळ बळकट करण्यास सुरू केलं गेलं. पक्ष विस्तारत असतानाच प्रश्न होता निवडणूक आयोगाच्या मान्यतेचा… कालांतराने पक्षाची नोंदणी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. निवडणूक आयोगाकडे नोंदणी करत असताना पक्षाने चरखा या निवडणूक चिन्हाची मागणी केली होती. इथे आयोगाने पक्षाला मान्यता दिली, पण चरखा चिन्ह देण्याची मागणी नाकारली.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने दुसरं निवडणूक चिन्ह सूचवण्याची सूचना केली. त्यामुळे आता काय? त्यानंतर घड्याळ या चिन्हाची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. आता निवडणूक चिन्ह म्हणून घड्याळाच का सूचवलं गेलं? तर यामागेही एक खास कारण होतं.

निवडणूक आयोगाने दुसरं निवडणूक चिन्ह सूचवण्याची मागणी केल्यानंतर दहा वाजून दहा मिनिटं ही वेळ दाखवणार घड्याळ हे चिन्ह सूचवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेची जी बैठक षण्मुखानंद सभागृहात झाली होती. ती बैठक दहा वाजून दहा मिनिटांनी सुरू झाली होती. त्यामुळे ही वेळ दाखवणार घड्याळ हे चिन्ह मागण्यात आलं आणि अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह निश्चित झालं.

- Advertisement -

- Advertisement -