घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या नियोजन बैठकीत वरिष्ठांसमोरच कार्यकत्यांचा गोंधळ

राष्ट्रवादीच्या नियोजन बैठकीत वरिष्ठांसमोरच कार्यकत्यांचा गोंधळ

Subscribe

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील प्रचाराच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कल्याणात बैठकीचे आयेाजन करण्यात आलं होतं. मात्र प्रचाराच्या यादीवरून कार्यकत्यांनी गोंधळ घातला. राष्ट्रवादीचे आमदार जगन्नाथ शिंदे आणि निरीक्षक सुभाष पिसाळ हे बैठकीला उपस्थित होते. मात्र वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमोर हा गोंधळ घातल्याने पक्षातील नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आला.

कल्याणातील आचार्य अत्रे रंग मंदिरासमेारील महिला मंडळ हॉलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते हे प्रचारासंदर्भात नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची माहिती देत होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी मध्येच त्यांना थांबवून त्यांच्या यादीवर आक्षेप घेतला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष कार्यकत्यांमध्ये शाब्दीक वादही झाला. पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोपही यावेळी काही कार्यकर्त्यांनी केला.

- Advertisement -

जिल्हाध्यक्ष हनुमंते यांनी संबंधित कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. विशेष म्हणजे आमदार जगन्नाथ शिंदे, निरीक्षक सुभाष पिसाळ यांच्यासमोरच हा सर्व गोंधळ सुरू होता. अखेर हनुमंते यांनी नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींचा फेरविचार करून त्यात बदल केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर या वादावर पडदा पडला. कल्याण लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील तर भिवंडी लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे सुरेश टावरे हे उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी स्थानिक कार्यकत्यांनी कशाप्रकारे प्रचार करावा याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र मतदानाला अवघा महिनाभर शिल्लक असतानाच पक्षातील अंतर्गत धूसफूसीचा फटका उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पक्षाचे काम नियोजनबद्ध कसं करता येईल यासाठी सेक्टरनुसार यादी तयार करण्यात आली आहे. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीबरेाबरच आगामी विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकांना होणार आहे. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकत्यांना अनेकवेळा सांगूनही ते काम करीत नसतील तर त्याची जबाबदारी दुसऱ्या कार्यकत्यावर द्यावी लागणार आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून मला काही अधिकार आहे, तसेच पक्षाला मला रिझल्ट द्यावा लागणार आहे. पक्षात गोंधळ अथवा कोणतीच धूसफूस नाही. नियोजनपध्दतीने काम सुरू आहे. – रमेश हनुमंते, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -