अजित पवारांसमोर घोषणाबाजी करत कार्यकर्ते म्हणाले, अध्यक्षपदी…

अजित पवार हे कार्यालयात दाखल होताच, आंदोलक कार्यकर्त्यांनी देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, अशा घोषणा दिल्या आणि अध्यक्षपदी शरद पवारचं असावेत, असं मत व्यक्त केलं.

Ajit Pawar and Sharad pawar
Ajit Pawar and Sharad pawar

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीची एक निवड समिती नेमण्यात आली. या समितीने एकमताने पवारांचा राजीनामा फेटाळला आणि हा प्रस्ताव शरद पवारांकडे पाठवण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत राजीनामा फेटाळल्याचं सांगितलं आणि लोकांच्या मनातील निर्णय समितीने घेतल्याचं म्हटलं. राष्ट्रवादीची नेमलेली समिती आज, शुक्रवारी 11 वाजता बैठक घेणार होती, त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे कार्यालयात दाखल होताच, आंदोलक कार्यकर्त्यांनी देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, अशा घोषणा दिल्या आणि अध्यक्षपदी शरद पवारचं असावेत, असं मत व्यक्त केलं. ( NCP activists said that President Of NCP should Sharad pawar only  )

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. सध्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच एका कार्यकर्त्यांने प्रदेश कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

अध्यक्ष निवडीच्या समितीत कोण आहे. ?

प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, के. के. शर्मा, पी.सी चाको, अजित पवार , जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, तसेच नरहरी झिरवळ , फौजिया खान, धीरज शर्मा ,सोनिया दूहन यांचा समावेश आहे.

( हेही वाचा: समितीच्या निर्णयावर शरद पवारांचं मत काय? प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टच सांगितलं )

शरद पवारांचं सूचक विधान

शरद पवारांनी गुरुवारी वाय.बी. सेंटरबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना तुम्हाला दोन दिवसांनी आंदोलन करण्याची गरज पडणार नाही, अशा आशयाचं विधाने केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. शरद पवार राजीनामा मागे घेणार असल्याचे सूतोवाच या विधानातून मिळाल्याचे अंदाज बांधले जात आहेत. मात्र, दुसरीकडे पक्षांतर्गत कोणाला अध्यक्षपद मिळणार? याचेही आडाखे बांधले जात आहेत.

सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच, सुप्रिया सुळेंकडे केंद्रीय नियोजनाची जबाबदारी तर अजित पवारांकडे राज्यातील राजकीय समीकरणांचे अधिकार सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.