खेडच्या सभेदरम्यान उद्धव ठाकरेंना मिळणार कार्यकर्त्यांचे बळ अन् पवारांना बसणार धक्का?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा होणार आहे. या सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांना कार्यकर्त्यांचे बळ मिळणार आणि राष्ट्रवादीला धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा होणार आहे. या सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांना कार्यकर्त्यांचे बळ मिळणार आणि राष्ट्रवादीला धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नावे असल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ncp Activists Will Join The Thackeray Group Ncp Sharad Pawar Guhagar Uddhav Thackeray Thackeray Group )

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातुन गेलेले कार्यकर्ते पुन्हा येत आहेत. तर राष्ट्रवादीमधील काही कार्यकर्तेही ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नावाबद्दल गुप्तता पाळण्यात आली आहे. त्यामुळे गुहागरमध्ये ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याच्या प्रयत्नात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर आरोप करत काही नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. पण आता उद्धव ठाकरे यांची सभा आहे याच पार्श्वभूमीवर काही कार्यकर्ते राष्ट्रवादीतुन ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

कसब्याचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. 2024 पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने एकत्रितपणे काम केलं तर विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. तसेच लोकसभेला 40 जागा निवडून येतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला असतानाच राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.


हेही वाचा – बाळा कदमांच्या अटकेनंतर ४८ तासांत माझ्यावर हल्ला, संदीप देशपांडेंनी सांगितली क्रोनोलॉजी