घरताज्या घडामोडी'महाविकास आघाडी चांगलं काम करतंय' तुम्ही पक्ष बळकट करा, अजित पवारांचे कार्यकर्त्यांना...

‘महाविकास आघाडी चांगलं काम करतंय’ तुम्ही पक्ष बळकट करा, अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी केली आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यात चांगल काम करत असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गंगापूरमधील नगरसेवकांनी पक्ष प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पक्षाला जिल्ह्यात बळकट करण्याचे आवाहन केलं आहे. महाविकास आघाडी सरकार चांगल काम करत आहे. परंतु सरकार चालवत असताना तिन्ही पक्ष आपली संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नांदेडसारख्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीला बळकट करा कोणतीही काळजी करु नका असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. गंगापूरच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतलं आहे. यावेळी अजित पवारांनी गंगापूरमध्ये राष्ट्रवादी कमकुवत असून बळकट करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी केली आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यात चांगल काम करत असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

- Advertisement -

राज्य सरकार चांगलं काम करतय

उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधताना म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात काम करत आहे. शिवसेना त्यांची संघटना वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी त्यांची संघटना वाढवण्याचे काम करतंय तर काँग्रेसही पक्ष वाढवण्याचे काम करत आहे. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत असताना स्वतःच्या पक्षाला कशी बळकटी आणता येईल याचाही प्रयत्न सुरु आहे. दोन वर्षात कोरोनाची किंमत सगळ्यांनी मोजली आहे. यातून आता बाहेर पडून पूर्व पदी सगळं यावं अशी आपली अपेक्षा असून शरद पवार देखील याबाबतचे मार्गदर्शन करत असतात. सध्या देशातील ५ राज्यांमध्ये लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. पुढील महिन्यात राज्यातील निवडणुका होण्याची शक्यता आहे. ही प्रकिया सुरुच राहते असे अजित पवार म्हणाले.

राज्यांतील अर्थचक्रावर परिणाम

औरंगाबाद मराठवाड्याचा प्रवेश द्वार म्हणून ओळखला जातो. प्रश्न अनेक आहेत. काही प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरु असतो. थोडे कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे देश पातळीवर असेल किंवा देशातील इतर राज्यांतील अर्थचक्रावर परिणाम झाला आहे. तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली असले तरी देखील अजून बरेच काम आपल्याला काही काही जिल्ह्यांमध्ये करावं लागणार आहे. त्यामध्ये औरंगाबाद, नांदेड जिल्हा असेल तसेच परभणी असे काही जिल्हे आहेत. या जिल्ह्यात अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. इतर जिल्ह्यातील काही लोक राष्ट्रवादीत प्रवेश करु पाहत आहेत. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भूमिका घेतील असे अजित पवारांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : मनसेला ‘किंग’ बनायचंय ‘किंगमेकर’ नाही, बाळा नांदगावकरांची शिवतीर्थावरील बैठकीनंतर प्रतिक्रिया

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -