घरमहाराष्ट्रNCP: आता पूर्वीचे अजितदादा राहिले नाहीत! 'त्या' वक्तव्याबाबत रोहित पवार नाराज

NCP: आता पूर्वीचे अजितदादा राहिले नाहीत! ‘त्या’ वक्तव्याबाबत रोहित पवार नाराज

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलेल्या भाषणादरम्यान शरद पवार यांना अनुसरून केलेले विधान सध्या चर्चेत आहे. याच विधानावरून आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे.

बीड: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलेल्या भाषणादरम्यान शरद पवार यांना अनुसरून केलेले विधान सध्या चर्चेत आहे. याच विधानावरून आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. “आम्हाला माहीत असलेले अजित पवार आणि आताचे अजित पवार हे फार वेगळे आहेत. केवळ भाजपच्या श्रेष्ठींना दाखवण्यासाठी हा सर्व खटाटोप त्यांच्याकडून सुरू असून, आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याच कुटुंबातील एखादा व्यक्ती त्यांच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून येऊ शकतो”, असं रोहित पवार यांनी म्हटले आहे. बीडमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयाच्या इमारत लोकार्पणप्रसंगी रोहित पवार बोलत होते. (NCP Ajit Pawar Dada is not same anymore Rohit Pawar is upset about that statement)

काय म्हणाले रोहित पवार?

भाजपा हा एक व्हायरस आहे आणि या भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांना तो व्हायरस लागतो. आताचे दादा आणि पूर्वीचे दादा फार वेगळे आहेत कदाचित त्यांच्या मनात शरद पवारांची भीती निर्माण झाली आहे. म्हणून ते बारामतीत, असं बोलले असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) आमदार रोहित पवारांनी भाजप आणि अजित पवारांवर टीका केली आहे.

- Advertisement -

रोहित पवार म्हणाले की, अजित दादांकडून हे अपेक्षित नाही. जे दादा आम्ही पाहिलेत, त्या दादांना आम्ही ओळखतो ते दादा फार वेगळे होते. ते भाजपाबरोबर गेल्यानंतर भाजपाचा विचार हा कुठेतरी त्यांना लागला आहे की काय? असं म्हणावं लागेल.

ते म्हणाले, नाहीतर अजून एक गोष्टीची भीती वाटते भाजपाला नाही तर दिल्लीतल्या लोकांना, कुठेतरी वाटावं की, आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात आम्ही काम करत आहोत, म्हणून असा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन काही वक्तव्य होत असेल, तर हो योग्य नाही.

- Advertisement -

अजित पवारांचं वक्तव्य काय होतं?

बारामतीत भाषण करताना अजित पवार यांनी लोकांना आवाहन केलं होतं की, आता लोक भावनिक करतील भावनेला बळी पडू नका, एवढे दिवस त्यांना साथ दिली. आता आम्हाला साथ द्या, असं रोहित पवार म्हणाले.

ज्या बापाने घडवलं त्या बापासाठी मरण आलं तरी चालेल – जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीचे ( शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गेल्या अनेक महिने महाराष्ट्र बघतोय की, अपात्रतेबाबत वकिलांमध्ये वाद होत आहेत. प्रतिज्ञा पत्र देण्यात आले तेव्हा शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती. या सगळ्या प्रतिज्ञापत्रांवर तटकरे यांची सही होती आणि तटकरे यांनी अनेक पद उपभोगली आहेत. मग शरद पवार हुकुमशाह झालेत हे कसं म्हणू शकतात? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला.

बारामतीमध्ये जो उमेदवार उभा करणार, त्याला अजित पवार समजा असं अजित पवार बोलतात. ज्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्यासोबत असं करताय तुम्ही? काँग्रेसची साथ सोडून शरद पवारांनी स्वतःचा पक्ष निर्माण केला. बंडखोरी करुन स्वतंत्र पक्ष टिकवणारे शरद पवार आहेत. शरद पवार स्वतः मैदानात उतरायचे कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन उतरायचे नाहीत. शरद पवार यांच्या प्रत्येक बैठकीला कोण जायचं? प्रत्येक ठिकाणी निर्णय कोण घ्यायचं, अशा प्रश्नांची सरबत्ती करत आव्हाडांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलं.

(हेही वाचा: Chandigarh Mayor Election : ही लोकशाहीची हत्या…; महापौर निवडणुकीवरील सुनावणीत रिटर्निंग अधिकाऱ्यावर CJI भडकले )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -