Homeमहाराष्ट्रNCP Ajit Pawar : मारहाणीबद्दल अजित पवारांचे नेते बाबुराव चांदेरेंनी सांगितले हे...

NCP Ajit Pawar : मारहाणीबद्दल अजित पवारांचे नेते बाबुराव चांदेरेंनी सांगितले हे कारण

Subscribe

पुणे : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय, पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी एका व्याक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष्य केले होते. त्यानंतर स्वतः अजित पवारांनी बाबुराव चांदेरे यांना फोन करून ताकीद दिली होती. त्यानंतर आता स्वतः बाबुराव चांदेरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, “सदर व्यक्ती परिसरामधील विकासाच्या कामाला आडवा आला होता. ठेकेदार आणि इंजिनिअरला धमकावत होता. त्यामुळे त्याला समजवायला गेल्यानंतर झटापट झाली आणि दोघेही पडलो,” असे स्पष्टीकरण दिले आहे. (NCP Ajit Pawar leader baburao chandere on beating person viral video)

हेही वाचा : Anjali Damania : मुंडे-कराडचे आर्थिक संबंध, दमानियांनी अजित पवारांना दिले पुरावे 

शनिवारी (25 जानेवारी) अजित पवारांचे निकटवर्तीय निकटवर्तीय मानले जाणारे बाबूराव चांदेरे यांनी विजय रौधळ नावाच्या एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यावेळी विजय रौधळ यांच्या डोक्याला तसेच गुडघ्याला मारहाण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, तक्रारीनंतर बाबुराव चांदोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण घडलेल्या या घटनेवर बाबुराव चांदेरे यांनी प्रतिक्रिया दिली की, “बाणेर परिसरातील लोकांनी ड्रेनेज लाईन असावी अशी मागणी केली होती. त्याचे काम सुरू असताना आमच्या इंजिनिअर आणि ठेकेदाराला काम करण्यामध्ये अडथळा निर्माण केला गेला. विजय रौधळने त्यांना धमक्यादेखील दिल्या होत्या. यानंतर मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या जीवनमरणाचा तसेच विकासाचा प्रश्न आहे, असे मी त्यांना सांगितले.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

“विजय रौधळने हा सगळा बनाव केला होता. काम सुरू असलेल्या ठिकाणी इंजिनिअरला धमकी दिली. त्याने पोकलेनच्या ड्रायव्हरवर दगडफेक सुरू केली. त्यावर ही दगडफेक करणे योग्य नाही, अशी विनंती मी केली. पण तरीही तो ऐकत नव्हता. मग विकासाच्या आडवे आल्याने मी फक्त त्याला धरायला गेलो आणि झटापटीत दोघेही पडलो.” अशी माहिती दिली. तसेच, “आम्ही दोघेही पडलो. पण त्यांच्या डोक्याला दगड लागला. आज या परिसरामध्ये आमची 100 एकर जमीन आहे. पण प्रत्येकवेळी हा व्यक्ती विकासाच्या आडवे येत होता. दोन कोटींचा रस्ता मंजूर झाला पण जवळपास दोन वर्षांपासून त्यांनी रस्ता करू दिला नाही.” असा उलट आरोप त्यांनी यावेळी केला.