मुंबई – विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रावादीने लोकसभेपेक्षा जोरदार कामगिरी केली. अजित पवारांनी लोकसभेतील पराभवानंतर नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीला निवडणूक कॅम्पेनचे काम दिले होते. अजित पवारांचे गुलाबी जॅकेट आणि त्यांची बदललेली भाषा ही अरोरा यांचीच देण असल्याचे म्हटले जाते. विधानसभा निवडणुकीत अजित पवरांच्या राष्ट्रवादीने 55 जागा लढून 41 जागा जिंकल्या आहे. त्यांच्या या य़शानंतर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यात नरेश अरोराही होते. अरोरा यांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या तेव्हा त्यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकला होता. यामुळे पक्षाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी संतप्त झाले. त्यांनी अरोरा यांना सुनावले की, तुम्ही पगारावरील शिपाई आहे. यावरुन राष्ट्रवादीत जुंपली आहे. अजित दादांच्या चिरंजीवांनी आता मिटकरींना सुनावले आहे.
काय आहे प्रकरण
विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उत्तुंग यश मिळाले. लोकसभेत झालेला पराभव आणि त्यामुळे आलेली नामुष्की विधानसभेच्या विजयाने धुवून निघाली आहे. यामागे अजित पवारांनी नरेश अरोरा यांच्या कंपनीला दिलेले काम असल्याचेही मानले जाते. लाडकी बहीण योजनेचा प्रचार कसा करायचा, त्यात अजित पवारांच्या पेहरावापासून सर्वकाही डिझाईन केले गेले होते, ते डिझाईन बॉक्स कंपनीचे नरेश अरोरा यांनी.
विधानसभेतील विजयानंतर अरोरा हे देखील अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आले. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवला होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाले यश हे कोणामुळे यावरुन आता श्रेयवाद सुरु झाला आहे. त्यावरुन अमोल मिटकरी यांनी एका वर्तमान पत्रात लिहिलेल्या लेखात अरोरा यांच्यावर निशाणा साधला. अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांच्यावर टीका करत थेट तुम्ही पगारी शपाई असल्याचं म्हटलं. तसेच लेखात म्हटले आहे की, हे यश राष्ट्रवादीचे आहे. मिटकरींच्या या वक्तव्यावरुन अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार संतप्त झाले. त्यांनी मिटकरींना सोशल मीडियात पोस्टकरुन सुनावले आहे.
पार्थ पवारांनी मिटकरींना जोरदार सुनावले…
पार्थ पवारांनी केलल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून पक्षविरोधी भूमिका घेत आहे. हे दुर्दैवी आहे. अरोरा आणि डिझाईन बॉक्स संदर्भातील त्यांच्या वक्तव्याचे माझा पक्ष, आणि माझे वडील अजिबात समर्थन करत नाही. तसेच मिटकरी यांनी याबद्दल आता माध्यमात प्रतिक्रिया देऊ नये, अशी तंबीही पार्थ यांनी मिटकरींना दिली. पार्थ यांनी गुलाबी वादळावरुन मिटकरींना खडे बोल सुनावले आहेत.
हेही वाचा : Ajit Pawar : 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबरला शपथविधी; अजित दादांनी सांगितला पुढील दोन दिवसांचा कार्यक्रम
Edited by – Unmesh Khandale