घरमहाराष्ट्रपुणेकर भाजपला माफ करणार नाहीत; गिरीष बापटांच्या प्रचारावरून राष्ट्रवादीची टीका

पुणेकर भाजपला माफ करणार नाहीत; गिरीष बापटांच्या प्रचारावरून राष्ट्रवादीची टीका

Subscribe

पुणेः कसबा निडवणुकीच्या प्रचारासाठी भाजपने खासदार गिरीष बापट यांनी मैदानात उतरवेल. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप बापट यांच्या जीवाशी खेळत आहे. पुणेकर त्यांना माफ करणार नाही, अशी टीका जगताप यांनी भाजपवर केली.

आजारी असतानाही बापट हे केसरी वाड्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उपस्थित होते. त्यावेळी बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बापट यांचे मार्गदर्शन ऐकताना महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांची आठवण सांगताना बापट हे भावनिक झाले होते. बापट यांना ऑक्सिजन लावला होता. त्यांचे हात थरथरत होते. तरीही त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष जगताप यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, कसबा प्रचारासाठी बोलावून भाजप हे खासदार बापटांच्या जीवाशी खेळत आहे. भाजपने गेली पाच वर्षे बापट यांना बाजूला ठेवले. कसबा पोट निवडणुकीचा उमेदवार धोक्यात आल्याचे लक्षात येताच भाजपला खासदार बापट यांची आठवण झाली. बापट यांना अशी वागणूक देणाऱ्या व त्यांना प्रचारासाठी बोलवणाऱ्या भाजपला पुणेकर कधीच माफ करणार नाहीत, अशा इशारा जगताप यांनी दिला.

- Advertisement -

बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बापट यांना भेटायला गेले होते. गुरुवारी बापट हे कसबा पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी आले. त्यांना बोलायलाही जमतं नव्हते. त्यामुळे थोडा वेळच त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संदेश लिहून आणला होता. गिरीष बापट यांचा हा संदेश भाजपचे उमदेवार हेमंत रासने यांनी कार्यकर्त्यांना वाचून दाखवला. सर्वांनी खूप काम करा, उमेदवार नक्की निवडून येईल, असे या संदेशात नमूद करण्यात आले होते. तुम्हा सगळ्यांना बऱ्याच दिवसांनी भेटून आनंद वाटला. सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्या आजारपणामुळे मला सगळ्यांशी बोलणं शक्य होत नाही आहे. मात्र तुमच्याशी वेळोवेळी संपर्क करेन, अशी भावनिक साद बापट यांनी कार्यकर्त्यांना घातली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -