फडणवीसांना खूश करण्यासाठी काही लोकांनी सामाजिक राजकारण बिघडवण्याची सुपारी घेतली, मिटकरींची टीका

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचेसुद्धा सोयीने राजकारण करुन महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीसांना खूश करण्यासाठी असं करु नका असे अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

Amol Mitkari

राज्यातील सामाजिक राजकारण बिघडवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खूश करण्यासाठी काही लोकांनी सुपारी घेतली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. राज्यात आता औरंगाबादनंतर अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा पुढे आला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यात यावे अशी मागणी सुरु आहे. दरम्यान आता अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतर करावे अशी मागणी जोर धरत आहे. राज्यातील वातवारण बिघडवण्याचा हा काही लोकांचा प्रयत्न असल्याची टीका आता सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना खूश करण्यासाठी अलिकडे काही लोकांनी सामाजिक राजकारण बिघडवण्याची सुपारी घेतली आहे. महाराष्ट्राचे सामाजिक राजकारण बिघडवण्याची सुपारी घेतली आहे. त्यातील एका सुपारी बहाद्दराणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरसुद्धा टीका केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचेसुद्धा सोयीने राजकारण करुन महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीसांना खूश करण्यासाठी असं करु नका असे अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

आपल्या बहुजन समाजात फूट पाडून वेगळ्या पद्धतीने फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामागे फडणवीसांची चाल आहे. त्यांच्या इशाऱ्याने पत्र लिहिण्यात आले आहे.

अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित आहे. औरंगाबादचे नामांतर करा आणि आता मागणी होत आहे. अहमदनगरचे नामांतर करा आमचे म्हणण स्पष्ट आहे. आताचे महत्त्वाचे मुद्दे ते बेरोजगारी, केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढली आहे. यावर तुम्ही बोलत नाही. केंद्राच्या पापांना झाकून ठेवायचे आणि महाराष्ट्राच्या सरकारला वेठीस धरायचे हे धोरण आखलं आहे. ते चुकीचे आहे. फडणवीसांनी जे धोरण आखलंय ते चुकीचे आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव शहराला देणं सोप असतं परंतु त्याच शहराला उपाशी राहण्याची वेळ येऊ नये याची व्यवस्था निर्माण करणं ही खरी त्यांच्या विचारांची अंमलबजावणी असते असे अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : राज्यात आता दारूची होम डिलिव्हरी करणे बंद, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा