घरमहाराष्ट्रचिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून 'या' उमेदवाराच्या नावावर झाले शिक्कामोर्तब

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून ‘या’ उमेदवाराच्या नावावर झाले शिक्कामोर्तब

Subscribe

राज्यात कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. भाजपकडून या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. पण महाविकास आघाडीकडून चिंचवड विधानसभेसाठी नेमकी कोणाला उमेदवारी द्यावी, हे स्पष्ट करण्यात आलेले नव्हते. पण अखेरीस अधिकृतरीत्या राष्ट्रवादीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. या दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल देखील करण्यात आले आहे. तर दुसरीकडे कसबा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले असताना, चिंचवड मतदारसंघातून महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार? हे ठरलेले नव्हते. पण अखेरीस या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवणार याची घोषणा करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत नाना काटे यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता कसब्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस आणि चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय सामना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे थोड्याच वेळात चिंचवडमध्ये दाखल होऊन त्यांच्या उपस्थितीत नाना काटे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

कसबा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना कधीचीच उमेदवारी जाहीर केली होती. पण चिंचवडमधील उमेदवारीबाबत मविआकडून गुप्तता पाळण्यात आली होती. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल कलाटे हे निवडणूक लढवतील अशी चर्चा करण्यात येत होती. राहुल कलाटे हे ठाकरे गटातील असले तरी ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतील असे बोलले जात होते. राष्ट्रवादीकडून देखील त्यांच्या नावाला कोणतीच हरकत नसल्याचे दिसून येत होते. पण जर का राहुल कलाटे यांना उमेदवारी जाहीर झाली असती तर यामुळे राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये बंडखोरी करण्यात आली असती, हे मात्र नक्की होते आणि म्हणूनच चिंचवडमध्ये बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल कलाटे यांना उमेदवारी न देता नाना काटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप! बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा

दरम्यान, सोमवारी (ता. 6 फेब्रुवारी) कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आज अजित पवार यांच्या उपस्थितीत नाना काटे हे चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता या दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हा सामना पाहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -