दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीमधील गोविंदबाग येथे पवार कुटुंब एकत्र आलं आहे. यात्र या फॅमेली गेट टू गेदरला अजित पवार अनुपस्थित आहेत. प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शदर पवार आणि अजित पवार भेटले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे यंदाच्या दिवाळीसाठी एकत्र येणार का? असा प्रश्न सर्वांच पडला होता.
शरद पवार यांच्या बारामतीयेथील निवासस्थानी शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीय जमले आहेत मात्र अजित पवार आले नाहीत. अजित पवार या फॅमेली गेट टू गेदला अनुपस्थित मागचं कारण सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं आहे.
मी आज महाराष्ट्राच्या जनतेला दिवाळी आणि पाडव्याच्या शुभेच्छा देते. हे वर्ष सगळ्यांचं सुख समृध्दीचं आणि आनंदाचं जावो अशी प्रार्थना करते. महागाई ,बेरोजगारी आणि दुष्काळाचं सावट आहे. यातून महाराष्ट्राची मुक्तता होईल हीच प्रार्थना पांडूरंगारचणी करते असं म्हणत सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
माझ्यासाठी माझ्या कुटूंबातील प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे. प्रत्येक जण आपली जबाबदारी आणि तब्येत सांभाळतो आहे. रोहित ही इथे आलेला नाही आहे. तो संघर्ष यात्रेसाठी बीडला आहे. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवार यांना डेंग्यूची लागल झाल आहे. गेल्या २० ते २५ दिवस अजित पवार कुठल्याच कार्यक्रमांना गेलेले नाहीत. रणजीत पवार आहेत आणि इतरही भाऊ आहेत.