घरताज्या घडामोडी'त्यांच्यामध्ये स्वाभिमान असेल तर', शरद पवारांची राज्यपालांवर खोचक टीका

‘त्यांच्यामध्ये स्वाभिमान असेल तर’, शरद पवारांची राज्यपालांवर खोचक टीका

Subscribe

राज्यातील मंदिरे उघडण्यावरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या वादग्रस्त पत्रावर अमित शाह यांच्यानंतर आता शरद पवार यांनी देखील भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले की, “स्वाभिमान असेल तर कोश्यारी यांनी पदावर राहायचे की नाही याचा विचार करावा.” शरद पवार सध्या अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. शहाण्याला शब्दांचा मार, त्यामुळे ही म्हण इथेही लागू पडते की नाही पाहावे लागेल. राज्यपाल शहाणे आहेत. त्यामुळे हा शब्द योग्य आहे की नाही? ते मला माहिती नाही, अशी खोचक टीका पवार यांनी राज्यपालांवर केली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळाजापूर येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना पवार यांनी राज्यपालांच्या पत्राचा समाचार घेतला. शरद पवार म्हणाले की, “१९५७ पासून मी महाराष्ट्राच्या राज्यपालांना पाहतोय. तसेच १९६७ साली आमदार झाल्यानंतर प्रत्येक राज्यापालांशी माझा संबंधही आला आहे. मात्र कोश्यारींनी घेतलेली भूमिका कधीच कुणी घेतली नव्हती. राज्यपाल पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहीजे. तसेच मुख्यमंत्री पदाचा देखील आब राखला गेला पाहीजे.”

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील राज्यपालांनी वापरलेल्या काही शब्दांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यातल्या त्यात ही चांगली गोष्ट असल्याचे पवार म्हणाले. आता गृहमत्र्यांनी जाहीर नापसंती व्यक्त केल्यानंतर कोश्यारी यांच्यात स्वाभिमान असेल तर त्यांनी या पदावर राहायचे की नाही याचा विचार करावा. गृहमंत्र्यांच्या टीकेनंतरही राज्यपाल पदावर राहणार असतील तर ठिक आहे, अशीही टीका पवार यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -