घरताज्या घडामोडीवेदांता प्रकल्प गुजरातला जाणे हे दुर्दैव; तळेगाव हीच योग्य जागा : शरद...

वेदांता प्रकल्प गुजरातला जाणे हे दुर्दैव; तळेगाव हीच योग्य जागा : शरद पवार

Subscribe

महाराष्ट्रातील नागरिकांच्या रोजगाराच्या दृष्टीने महत्वाचा असलेला वेदांता प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने मागील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून नव्या सरकारवर हल्लाबोल केला जात आहे.

महाराष्ट्रातील नागरिकांच्या रोजगाराच्या दृष्टीने महत्वाचा असलेला वेदांता प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने मागील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून नव्या सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. अशातच राष्टट्रवादी कॉंग्रेसते अध्यक्ष शरद पवार यांनीही हा प्रकल्प गुजरातला गेल्याने हल्लाबोल केला आहे. तसेच, “वेदांता प्रकल्प गुजरातला जाणे हे दुर्देव आहे. या प्रकल्पाला तळेगाव हीच योग्य जागा होती. प्रकल्पावरून राजकारण केले जात आहे”, असे शरद पवार यांनी म्हटले.

“फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणं हे दुर्दैवी आहे, यावर त्यापेक्षा आणखी मोठा प्रकल्प आणण्याचे आमिष म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखे आहे. यावर आता चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा मोठा प्रकल्प दिला, तर त्याचे स्वागतच आहे”, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली.

- Advertisement -

“तळेगाव हा जो स्पॉट आहे. त्याच्या आजूबाजूचा चाकण आणि रांजनगाव हा ऑटोमोबाईलसाठी अनुकूल आहे. इथं जर हा प्रकल्प असता तर कंपनीला अधिक फायदेशीर असता. त्यामुळे तळेगाव हीच या प्रकल्पासाठी योग्य जागा होती. महाराष्ट्रातून हा प्रकल्प जाणे म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे, तसं व्हायला नको होतं”, असेही शरद पवार यांनी म्हटले.

“महाविकास आघाडीने यावर काही निर्णय घेतला नाही असा आरोप करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि उदय सामंत हे होते. तरीही ते असं बोलतात. फॉक्सकॉनच्या बदल्यात दुसऱ्या प्रकल्पाला अर्थ नाही. केंद्राची सत्ता हाती असण्याचे अनुकूल परिणाम काही राज्यांवर होत असतात. त्यामध्ये गुजरात आहे” असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘कट कमिशन’मुळे वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये; शेलारांची मविआ सरकारवर संशयाची सूई

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -