घरताज्या घडामोडीशरद पवारांच्या तोंडातील अल्सर पुन्हा बळावला, तातडीने झाली शस्त्रक्रिया

शरद पवारांच्या तोंडातील अल्सर पुन्हा बळावला, तातडीने झाली शस्त्रक्रिया

Subscribe

शरद पवारांवर पित्ताशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणीमध्ये शरद पवार यांच्या तोंडामध्ये अल्सर झाल्याचे आढळले. त्यामुळे तातडीने हा अल्सर काढून टाकण्याची शस्त्रक्रिया ब्रीच कॅंडी हॉस्पिटमध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती जाहीर केली आहे. सध्या राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे हॉस्पिटलमध्येच दाखल असून ते पुरेशी विश्रांती घेत असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हॉस्पिटलमध्ये दाखल असतानाही शरद पवार राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दैनंदिन परिस्थिती माहिती करून घेत असतानाच कोरोनाच्या परिस्थितीवर ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. लवकरच ते आपले नियमित असे पक्षाचे काम सुरू करतील असेही नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. शरद पवार यांना पित्ताशयाच्या खड्याचा त्रास होऊ लागल्याने ३० मार्च रोजी त्यांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर पंधरवड्यातच त्यांचे पित्ताशय काढून टाकण्याचा निर्णय ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने घेतला. डॉ मायदेव यांच्या अध्य़क्षतेतील टीम शरद पवारांची गॉल ब्लॅडरची शस्त्रक्रिया केली. त्यानंतरच्या नियमित आरोग्याच्या पाठपुराव्यासाठीच शरद पवार हे ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्या तोंडात अल्सर वाढल्याचे दिसून आले. त्यामुळेच तातडीने अस्लरवर शस्त्रक्रिया करून तो काढून टाकण्यात आला.

शरद पवार यांनी याआधीच तोंड्याच्या अल्सरविरोधात मोठा लढा दिला आहे. कर्करोगाशी यशस्वी झुंज दिलेले शरद पवार हे स्वतः ओरल  इरॅडिकेशन २०२२ मोहीमेचे एम्बेसेडर आहेत. सुपारीमुळे त्यांच्या तोंडात झालेल्या अस्लरमुळे पवारांच्या तोंडातील सगळे दात काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळेच शरद पवारांना बोलण्यातही अनेकदा अडचण जाणवते. तोंडाच्या अस्लरवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अनेकदा सूज जाणवतानाच आपले तोंड पुर्णपणे उघडण्यासही अडचणी येत असल्याचे शरद पवारांनी एका जाहीर कार्यक्रमातही स्पष्ट केले होते.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -