घरताज्या घडामोडीशरद पवारांच्या एन्ट्रीने फडणवीसांचा सत्ता स्थापनेचा खेळ लांबला

शरद पवारांच्या एन्ट्रीने फडणवीसांचा सत्ता स्थापनेचा खेळ लांबला

Subscribe

महाविकास आघाडीला अडिच वर्षे पूर्ण झाली. या अडिच वर्षात आम्ही बऱ्याच संकटांना तोंड दिले. मागील दोन वर्षे कोरोनाचा काळ होता. या काळात या सरकारच्या आरोग्य खात्याने उत्तम काम केले. पण आता हे विधानसभेचे सभासद आता महाराष्ट्राच्या बाहेर गेले.

एकिकडे भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे (eknath Shinde) या दोघांमध्ये सत्तास्थापनेचा मुहूर्त आता काही तासांवर आला असे वाटत असतानाच आता या सर्व प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांनी उडी घेतली आहे. शरद पवारांच्या एन्ट्रीमुळे ही सर्व कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना (Revolt MLA) सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रात यावे लागणार आहे. परिणामी आता पुढील काही दिवस एकनाथ शिंदे गट आणि फडणवीसांच्या सत्तास्थापनेचा खेळ लांबला आहे. (NCP Chief sharad talk on shiv sena mla revolt and mva government)

गुवाहटीत असलेल्या एकनाथ शिंदे गटाचा एक व्हिडीओ काही मिनिटांपूर्वी सोशल माडियावर व्हायरल झाला. यामध्ये एकनाथ शिंदे नाव न घेता भाजपाचा पाठिंबा असल्याचे बोलत आहेत. परंतु, त्यानंतर तातडीने महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यानी थेट बंडखोर आमदारांना सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रात यावे लागणार असल्याचे म्हटले. पवार म्हणाले की, महाविकास आघाडीला अडीच वर्षे पूर्ण झाली. या अडीच वर्षात आम्ही बऱ्याच संकटांना तोंड दिले. मागील दोन वर्षे कोरोनाचा काळ होता. या काळात या सरकारच्या आरोग्य खात्याने उत्तम काम केले. पण आता हे विधानसभेचे सभासद आता महाराष्ट्राच्या बाहेर गेले. ज्याप्रकारे त्यांनी तिथे नेले गेले त्याची वस्तूस्थिती ते इथे आल्यावर सांगतील. तसेच, ते इथे आल्यानंतर आपण शिवसेनेच्या बरोबर आहोत हे स्पष्ट करतील. त्यानंतर बहुमत कोणाचे आहे हे सिद्ध होईल. विधानसभेत जेव्हा फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा कळेल हे सरकार मेजोरीटी मध्ये आहे की नाही.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मला विश्वास आहे की शिवसेनेचे आमदार मुंबईत परतले की परिस्थिती बदलेल. बंडखोर आमदारांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आहे का? असे विचारला असता एकदम असा निष्कर्ष काढणं योग्य नाही त्यांच्यातल्या काही लोकांची वेगवेगळ्या केंद्रीय एजन्सीकडून चौकशी सुरू आहे किंवा होती, त्यामुळे त्यांच्यावर याचा काही परिणाम झाला नाही असे म्हणता येणार नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.

“बंडखोर आमदारांची निधी न मिळण्याबाबतचा आरोप हे वस्तूस्थितीला धरुन नाही. त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो कायद्याविरोधात आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्यांनी मतदारसंघाचं फक्त कारण दिलं. छगन भुजबळ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्यासोबत १२ ते १५ जण होते. त्यानंतर जी निवडणूक झाली होती त्यामध्ये एक-दोन जण सोडला तर बाकी सर्वांचा पराभव झाला होता, असा महाराष्ट्रातला अनुभव आहे. त्यामुळे जे लोक आता आसामला गेले आहेत त्यांच्यासोबत तसंच होऊ शकतं. त्यासाठी त्यांनी आपल्या मतदारांना निधीचा मुद्दा सांगितला आहे”, असेही शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

पवार म्हणाले की, “अजित पवारांनी महाराष्ट्रातील मुंबईची स्थिती पाहून विधान केलं असावं. इथून प्रत्यक्ष लोक हलवणं आणि ऑपरेशन करणं यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत. अजित पवारांना इतकी माहिती जरुर आहे. पण गुजरात आणि आसाम इथली परिस्थिती (राज्याच्या बाहेरची) मला माहिती आहे, अजित पवारांना माहिती नाही.”

एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं विधान केलं आहे. माझ्याकडे सर्व राष्ट्रीय पक्षांची यादी आहे. यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, कम्युनिस्ट पार्टी, सीपीएन ही सहा अधिकृत पक्षांची यादी आहे. या सगळ्यांचा यात हात आहे का? जे नाहीत याचा विचार केला तर कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी म्हटले.

नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे?

समोर आलेल्या व्हिडिओनुसार एकनाथ शिंदे यांच्या या बंडखोरीच्या मागे भाजपच असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिंदे यांचा बंडखोर आमदारांशी चर्चा करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात ते राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असून ते आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही, असं म्हणताना दिसत आहेत.

आपली सर्व सुख-दुःख सारखीच असून काही असेल तर आपण एकजुटीने करायचं आहे, असं एकनाथ शिंदे व्हिडिओमध्ये आमदारांना सांगताना दिसत आहेत.

शिंदे ज्या राष्ट्रीय पक्षाबद्दल आमदारांना सांगत आहेत तो भाजपच असल्याचा दावा करण्यात येत आहे. यादरम्यान, भाजपच्या गोटातही हालचालींना वेग आला असून विरोदी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. तेथे ते गृहमंत्री अमित शहा, जे.पी नड्डी यांच्याशी सद्य परिस्थितीवर चर्चा करणार असल्याचं कळते आहे.


हेही वाचा – एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे भाजपचाच हात, आमदारांशी चर्चा करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -