महाराष्ट्र गुजरातच्या पुढं नेणं शक्य झालं नाही तर फडणवीस राजीनामा देणार का?, राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

Devendra Fadnavis

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राला का मिळाला नाही, यावरून राज्य सरकारला विरोधकांकडून धारेवर धरलं जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र गुजरातच्या पुढं नेणं शक्य झालं नाही तर फडणवीस राजीनामा देणार का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाई़़ड क्रास्टो यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे.

क्लाई़़ड क्रास्टो यांनी ट्वीट करत फडणवीसांना काही प्रश्न विचारले आहेत. महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत गुजरातच्या पुढे, ही घोषणा करण्यापूर्वी त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांची परवानगी घेतली का?, असा सवाल क्रास्टो यांनी उपस्थित केला.

तसेच क्रास्टो पुढे म्हणाले की, जर हे शक्य झाले नाही तर फडणवीसजी राजीनामा देणार का? ज्या गतीने सर्व व्यवसाय गुजरातला पाठवत आहे, तो पर्यंत हे शक्य होणार नाही, असं क्रास्टो म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

ज्या गतीने सर्व व्यवसाय गुजरातला पाठवत आहे, तो पर्यंत हे शक्य होणार नाही. देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येण्यापासून कुणी थांबविली? त्यातून निर्माण होणारे 5 लाख रोजगार कुणी थांबविले ? महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा 10 वर्ष पुढे जाण्यापासून कुणी रोखले?, असे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले होते.


हेही वाचा : माझ्या मना बन दगड, चंद्रकांत पाटील यांची खदखद कायम