‘ईडी सरकार’ म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राज्यातील नव्या मंत्र्यांवर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार आज अखेर झाला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्यात एकूण 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या प्रत्येकी 9 आमदारांचा समावेश होता.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार आज अखेर झाला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्यात एकूण 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या प्रत्येकी 9 आमदारांचा समावेश होता. मात्र, राज्यातील शिंदे सरकारच्या विस्तारानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नव्या मंत्र्यांचे घोटाळ्यांशी असलेले संबंध समोर आणले आहेत. तसेच, या 18 मंत्र्यांपैकी शिंदे गटातील मंत्र्यांनी भाजपाविरोधात आवाज उठवला होता. मात्र आता त्याचे काय झाले, असा सवाल उपस्थित करत सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार स्थापनेनंतर ईडीचे सरकार म्हणत विरोधकांकडून हल्लाबोल केला जात होता. त्यानुसार, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या ट्विटरवर नव्या मंत्र्यांचे घोटाळ्याशी असलेले संबंध पोस्टरच्या माध्यमातून समोर आणले आहेत.


हेही वाचा –  शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार : 18 जणांना राज्यपालांनी दिली शपथ