Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ओबीसीच्या रिक्त जागांवर ओबीसी उमेदवार देणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय

ओबीसीच्या रिक्त जागांवर ओबीसी उमेदवार देणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय

बैठकीत सर्व सदस्यांनी आपल्या स्थानिक भागातील प्रश्न पक्षासमोर मांडले.

Related Story

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांवर निवडणुका झाल्यास तेथे ओबीसी समाजातील उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी दिली. राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. पक्षाचे पालकमंत्री, संपर्कमंत्री, आमदार यांनी नुकसानीचा पाहणी दौरा करुन उपाययोजना करावी, असे निर्देश पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याची माहिती दिली आहे. राष्ट्रवादमधील स्थानिक निवडणुका, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांची शरद पवार यांनी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी परभूत नेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून संघटनात्मक चर्चा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, सर्व फ्रंटलाईन सेलचे प्रदेशाध्यक्ष तसेच २०१९ च्या विधानसभेमध्ये निवडणुकीत अल्पशा मताने पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेतली. राज्याच्या विविध भागातील प्रश्न,समस्या यांची माहिती शरद पवार यांनी घेतली. संघटनात्मक आढावाही त्यांनी घेतला. या बैठकीत सर्व सदस्यांनी आपल्या स्थानिक भागातील प्रश्न पक्षासमोर मांडले. तसेच पक्षाच्या ध्येयधोरणांवर अनेकांनी आपली मते मांडली. यावर राज्य सरकारच्या माध्यमातून एकत्रितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना दिल्याचे राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करा

- Advertisement -

या बैठकीत राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे. त्यानुसार पालकमंत्री, संपर्कमंत्री, आमदार यांनी नुकसानीचा पाहणी दौरा करुन उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मलिक यांनी यावेळी सांगितले. तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून सोडविण्यात येणारे प्रश्न निश्चित सोडवले जातील. मात्र इंधन दरवाढ, गॅसदरवाढ असे प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहेत. त्यावर कोरोना नियमावली पाळून पक्षाने आपली भूमिका जनतेपुढे मांडण्यावर निर्णय घेण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

परमबीर सिंह मुख्य आरोपी

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, ज्या पद्धतीने एनआयएने चार्जशीट दाखल केली आहे. त्या चार्जशीटमध्ये सायबर एक्सपर्टने सांगितले आहे की, सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्याच्याबाबतीत ५ लाख रुपये देण्याचं काम माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलं होते. एकंदरित अँटालिया केसमध्ये सचिन वाझेला मुख्य आरोपी करण्यात आलं आहे. या चार्जशीटमध्ये ज्यांना परमबीर सिंहनी पोलीस सेवेत समावून घेतले, विशेष अधिकार ज्यांना देण्यात आलं या घटनाक्रम झाल्यानंतर या घटनेच्या चौकशीचे काम त्यांच्याच हातात देण्याचे काम परमबीर सिंह यांनी केलं असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.


- Advertisement -

हेही वाचा : देशमुखांविरोधात भाजपचे कट-कारस्थान, एनआयएच्या चार्जशीटवर नवाब मलिकांची प्रतिक्रिया


 

- Advertisement -