Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र बँका बुडवल्या त्यांना पक्षात घेणार का? राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये धुसपूस

बँका बुडवल्या त्यांना पक्षात घेणार का? राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये धुसपूस

विधानसभा निवडणूकीत ज्या ७६ हजार मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला त्यांची सहमती घेतली का?

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूकीपुर्वी भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण दिले होते. यावरुन राष्ट्रवादीतील पदाधिकारी नाराज असून पक्षात २ गट पडल्याचे दिसते आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूक जवळ आली असताना राष्ट्रवादीत २ गट पडले असून एक गट आमदार शशिकांत शिंदेच्या वक्तव्यावर आक्रमक झाला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं राजकारण न समजायला जनता खुळी नाही असे विधान राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याने केले आहे. शिवेंद्रराजेंना राष्ट्रवादीत येण्यासाठी खुल्ली ऑफर दिल्याने राष्ट्रवादीतील नेते नाराज झाले आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करत नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार यांनी प्रसिद्ध पत्रक जारी करत असे म्हटलंय की, शिवेंद्र राजेंना राष्ट्रवादीत येण्याचं निमंत्रण दिले गेले याबाबत मागील काही दिवसांपासून आम्ही माध्यमांद्वारे ऐकत आहोत. तसेच विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवारांनी भर पावसात माझी झालेली चूक दुरुस्त करा आणि या दोन्ही राजांना घरपोच करा असे वक्तव्य केले. जनतेने पवारांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवून जावलीतून ७६ हजारंच्या भरघोस मतांनी विजय मिळवून दिला. मी दरमहिन्याला शरद पवारांची आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतो. परंतु या भेटीमध्ये मला एकदाही शिवेंद्रराजांच्या पक्षांतराबाबत सांगण्यात आले नाही. असे जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करत नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

दीपक पवार पुढे म्हणाले की, शशिकांत शिंदें शिवेंद्रराजे भोसलेंना राष्ट्रवादीत या म्हणाले. तुमच्या नेतृत्वात नगरपालिका लढू असेही म्हणाले यावर हा काय घरगुती पक्षप्रवेश कार्यक्रम आहे का? काहीतरी विचार करुन बोलले पाहिजे, विधानसभा निवडणूकीत ज्या ७६ हजार मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला त्यांची सहमती घेतली का? ज्यांनी २ बँका बुडवल्या आणि ५ संस्था मोडीत काढल्या त्यांनाच तुम्ही राष्ट्रवादीत घेणार का? असा प्रश्न दीपक पवार यांनी शशिकांत शिंदेना आपल्या प्रसिद्धी पत्रकातून विचारला आहे.

- Advertisement -