मुख्यमंत्री शिंदेंनी फेसबुक पेजवर कमेंट बॉक्स केला हाईड; राष्ट्रवादी म्हणते…

NCP

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मिडियावरील कमेंट बॉक्स बंद केला आहे. ही गोष्ट समोर आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. दरम्यान याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केले आहे. या ट्विटद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री शिंदेंवर उद्धव ठाकरेंचे उदाहरण देत टीका केली आहे.

ट्विटमध्ये काय? –

या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे हे संवाद साधत नाहीत, असा आरोप करुन शिंदे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवर लोकांशी संवाद होऊ नये अशी तरतूद केली आहे, अशी टीका केली आहे.

 

ncp

उद्धव ठाकरेंवर वेळ देत नसल्याची शिंदे गटाची टीका –

दरम्यान माजी मुख्यमंत्री आमदारांना भेटत नाहीत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधत नाहीत, असा आरोप करुन शिंदे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला होता. यानंतर शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार राज्यात आले. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे उदाहरण देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकनाथ शिंदे यांच्यावर सोशल मिडियावरील कमेंट बॉक्स बंद करण्यावरू टीका केली आहे.